भारतीय स्वयंपाकघरातील अविभाज्य मसाला असलेले धणे आता आरोग्य (Health)तज्ञ आणि फिटनेस प्रेमींसाठी नवीन चर्चेचा विषय बनले आहेत. केवळ चव आणि सुगंधासाठीच नव्हे तर आरोग्यावर होणाऱ्या विलक्षण फायद्यांमुळे धन्याचा वापर झपाट्याने वाढू लागला आहे. अलीकडील आरोग्य तज्ञांच्या निरीक्षणानुसार, नियमितपणे धन्याचे पाणी पिणाऱ्यांमध्ये वजन नियंत्रण, पचनशक्ती सुधारणा आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याची क्षमता अधिक प्रभावी दिसून येत आहे. धण्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के तसेच फायबर आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

विशेष म्हणजे अपचन, गॅस, पोटफुगी आणि आम्लपित्त यांसारख्या समस्या असणाऱ्यांसाठी धन्याचे पाणी प्रभावी उपाय मानले जात आहे. आयुर्वेदानुसार धणे पित्तशामक असून पचनसंस्थेला शांत करून अन्नाचे योग्य रीतीने विघटन करण्यास मदत करतात. त्यामुळे अनेक लोक दिवसभरातील एक ग्लास (Health)धन्याचे पाणी पिण्याची सवय लावत आहेत. फिटनेस समुदायातही हे पाणी नैसर्गिक वजन कमी करणारा घटक म्हणून लोकप्रिय होत असून यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होण्यास मदत होत असल्याचे मानले जाते.
आरोग्य तज्ञांचे मत आहे की धणे पाण्यात रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास त्या परिणामांचा प्रभाव अधिक दिसून येतो. परंतु डायबिटीज, गर्भधारणा किंवा औषधोपचार सुरू असणाऱ्यांनी याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दरम्यान, सोशल मीडियावरही “धनिया वॉटर चॅलेंज” ट्रेंड होत असून अनेकांनी त्याचे फायदे स्वतः अनुभवत असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा :
केवळ 411 रुपये…सुकन्या योजनेत कसे मिळतील 72 लाख
नागरिकांनो पॅन कार्ड बाबत ‘ही’ चूक केल्यास होऊ शकतो हजारोंचा दंड
हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट? लग्नाअगोदरच देणार क्रिकेटरच्या पहिल्या बाळाला जन्म..