प्रत्येक पालकाची एकच इच्छा असते — आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित असावे, तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत कोणत्याही टप्प्यावर आर्थिक संकट निर्माण होऊ नये. अशाच पालकांसाठी केंद्र सरकारची ‘सुकन्या समृद्धी योजना’ हा एक फायदेशीर आणि विश्वासार्ह पर्याय ठरत आहे. पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेत (Yojana)केंद्र सरकारची हमी आणि बाजारातील इतर योजनेच्या तुलनेत अधिक व्याजदर मिळत असल्याने ही स्कीम प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या तिमाहीसाठी या योजनेवर तब्बल 8.2% व्याजदर देण्यात आला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळू शकतो. या योजनेंतर्गत (Yojana)फक्त 15 वर्षे पैसे जमा करावे लागतात, मात्र योजना 21 वर्षांनंतर मॅच्युअर होते. म्हणजेच शेवटच्या सहा वर्षांत पैसे न भरता देखील चक्रवाढ व्याजामुळे रक्कम सतत वाढत राहते. उदाहरणार्थ, जर पालकांनी या योजनेत दरवर्षी 1.50 लाख रुपये जमा केले तर 15 वर्षांत एकूण 22.50 लाख रुपये गुंतवणूक होतील.

सध्याच्या व्याजदरावर ही रक्कम 21 वर्षांनंतर जवळपास 71,82,119 रुपये होते. म्हणजेच जवळपास 49 लाख रुपये फक्त व्याजाच्या स्वरूपात लाभ मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत कोणताही बाजारजोखीम नसल्याने मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी सुरक्षित आणि स्थिर असा मोठा फंड तयार करण्याची संधी या योजनेत मिळते. त्यामुळे भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी ही योजना पालकांसाठी सर्वात आकर्षक पर्याय ठरत आहे.

हेही वाचा :

नागरिकांनो पॅन कार्ड बाबत ‘ही’ चूक केल्यास होऊ शकतो हजारोंचा दंड
हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट? लग्नाअगोदरच देणार क्रिकेटरच्या पहिल्या बाळाला जन्म..
गल्ली बोळातले “चेहरे” आता चौका चौकात दिसू लागले!