पॅन कार्ड(PAN card) हे बँकिंग, आर्थिक व्यवहार, नोकरी, गुंतवणूक आणि सरकारी सेवांसाठी अत्यावश्यक कागदपत्र आहे. मात्र, अनेक नागरिकांकडून पॅन कार्ड संदर्भात गंभीर चुका होत असल्याचे आयकर विभागाने लक्षात आणून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता Pan Card 2.0 ही नवी व्यवस्था लागू केली आहे. याद्वारे ‘एक व्यक्ती – एक PAN’ ही प्रणाली अधिक कठोरपणे लागू करण्यात आली आहे.नवीन Pan 2.0 प्रणालीमुळे आता एखाद्या व्यक्तीकडे दोन किंवा त्याहून अधिक पॅन कार्ड असल्यास ते त्वरित ओळखले जाणार आहे. आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, दोन पॅनकार्ड ठेवणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे चुकून किंवा जाणूनबुजून तयार झालेले डुप्लिकेट पॅन असतील तर नागरिकांनी सावध राहणं गरजेचं आहे.

सरकारने सुरू केलेल्या Pan 2.0 प्रणालीमध्ये अत्याधुनिक QR कोड आणि डिजिटल पडताळणी प्रणाली जोडली आहे. नवीन पॅन कार्डावर(PAN card) असलेला डायनॅमिक QR कोड स्कॅन केल्यावर पॅन खरा आहे की डुप्लिकेट, हे त्वरित समजू शकणार आहे. तसेच पॅन तयार होताना आधार आणि इतर माहितीचे रिअल-टाइम व्हेरिफिकेशन केले जाणार आहे.गत काही वर्षांत अनेक व्यक्तींनी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या व्यवहारांसाठी दोन किंवा अधिक PAN वापरत असल्याचे आयकर विभागाच्या तपासात आढळले होते. या फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार थांबवण्यासाठी ही नवी प्रणाली आणली गेली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जर तुम्हाला शंका असेल की तुमच्या नावावर दोन किंवा अधिक पॅन असू शकतात, तर ते तपासण्यासाठी काही सोपे टप्पे सांगितले आहेत. यासाठी प्रथम Income Tax e-Filing Portal वर जाऊन PAN Status Check निवडा आणि तुमचा पॅन क्रमांक टाका. जर प्रणालीमध्ये दोन पॅन दिसले तर अतिरिक्त पॅन त्वरित सरेंडर करणे आवश्यक आहे. यासाठी NSDL किंवा UTIITSL वेबसाइटवर पॅन Surrender Form (पॅन Change/Correction Form 49A) भरून सबमिट करावा लागेल.
आयकर कायद्याच्या कलम 272B अंतर्गत, कोणत्याही व्यक्तीकडे दोन किंवा अधिक पॅन आढळल्यास त्याच्यावर ₹10,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. मात्र, एखाद्याचे जुने पॅन हरवल्याने नवीन पॅन चुकून तयार झाला असेल आणि त्यासाठी योग्य स्पष्टीकरण दिले तर दंड माफ होण्याची शक्यता आहे.नियमांचे उल्लंघन जाणूनबुजून केले असल्यास कठोर कारवाई होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅनसंबंधित माहिती अपडेट ठेवणे आणि अनावश्यक डुप्लिकेट पॅन असल्यास त्वरित रद्द करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :
गल्ली बोळातले “चेहरे” आता चौका चौकात दिसू लागले!
“सर्वकाही उडवून देऊ”, ‘या’ अभिनेत्याला पाकिस्तानातून धमकी
तब्बल 4 हजार रुपयांनी कोसळली चांदी, सोन्याचे भावही थंडावले