कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका नजीकच्या काळात होणार आहेत मात्रत्या नेमक्या कोणत्या महिन्यात होणार याची नक्की माहिती मिळत नाही पण तरीही शहराच्या गल्लीबोळातले”चेहरे”आता चौका चौकात होर्डिंगवर, डिजिटल फलकांवर दिसू लागले आहेत. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरही त्याला अपवाद नाही.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत(Elections) कोणत्याही स्थितीत 50 टक्क्याच्या वर आरक्षण जाणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेल्या आहेत मात्र अनेक जिल्ह्यात 50% च्या वर आरक्षण दिले गेले असल्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

त्या संदर्भात येत्या मंगळवारी न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना मिळण्याच्या शक्यता आहेत.राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका(Elections) कोणत्याही स्थितीत पुढे जाणार नाहीत. मुदतवाढ दिली जाणार नाही. दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व महापालिकांची लोकप्रतिनिधींची सभागृहे अस्तित्वात आली पाहिजेत अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत पण तरीही या निवडणुका निर्धारित वेळेत होण्याची शक्यता दिसत नाही. फेब्रुवारी मार्चपर्यंत या निवडणुका पुढे जातील असे बोलले जाते.जानेवारी महिन्यात किंवा त्यानंतरच्या एक दोन महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होतील हे गृहीत धरून इच्छुक उमेदवारांनी”मी उमेदवार आहे”असे सूचकपणे सांगण्यास किंवा जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूर शहरात चौका चौकात ओळखीचे चेहरे आणि बिन ओळखीचे चेहरे होर्डिंग आणि डिजिटल फलकाच्या माध्यमातून दिसू लागले आहेत.विकासाचा ध्यास, गतिशील विचार. घराणेशाही नको. नव्या चेहऱ्याला संधी द्या. आता प्रभागात फ्रेश चेहरा हवा. विकासाचे ध्यास पर्व घेऊन पुढे आलो आहे.परिवर्तन हवे. बदल हवा.प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास. कुठे नेऊन ठेवले माझे कोल्हापूर?. मी तुमच्याबरोबर आणि तुम्ही माझ्याबरोबर. तेच तेच चेहरे पुन्हा नकोत. आता बदल घडवूया. कोल्हापूरला प्रगतीच्या महामार्गावर नेऊया. अशा आशियांचे विविध फलक उमेदवारांच्या चेहऱ्यासह चौका चौकात दिसू लागले आहेत.यंदा प्रथमच चौरंगी सदस्य पद्धती आल्यामुळेभल्या भल्यांना विस्तारलेल्या मतदार संघात शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचायचे कसे असा प्रश्न पडला आहे.

गेल्या विसर्जित सभागृहातील अनेक सदस्य मतदारसंघ मोठा झाल्यामुळे अडचणीत आले आहेत. चौरंगी सदस्य पद्धतीमुळे या निवडणुकीत धन दांडगेच दिसू शकतात अशा सार्वत्रिक प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. आत्तापासूनच खर्च नको म्हणून अनेक इच्छुकांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. डिसेंबर महिन्यात त्यांचेही चेहरे होर्डिंग च्या माध्यमातून चौका चौकात दिसू लागतील. सध्या धनदांडग्या उमेदवारांकडून प्रभागातील मतदारांच्यासाठी धार्मिक पर्यटन सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सौंदत्ती ची यात्रा आहे. अनेक इच्छुकांनी सौंदत्तीसाठी मतदारांना विशेषता महिला मतदारांना नेण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी आराम गाड्या तसेच महामंडळाच्या बसेस आरक्षित केल्या जात आहेत.करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी धार्मिक पर्यटकांची गर्दी वाढत आहे आणि त्यामध्ये किमान 25 टक्के पर्यटक असे आहेत की तेइच्छुकांच्यामाध्यमातून करवीर निवासिनीच्या दर्शनासाठी येत आहेत येऊ लागले आहेत.

हेही वाचा :

तुम्ही जर नारळ पाणी प्याल तर पडेल महागात! पण कधी? जाणून घ्या
शिंदे गटातील उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात; ‘इतक्या’ जणांचा मृत्यू
स्मृती मंधानाच्या हळदीला….! टीम इंडियाच्या सहकाऱ्यांची धमाल मस्ती, पाहा Video