महिला(women)सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवून आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत होती. अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून लाभार्थ्यांच्या सोयीसाठी निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

या मुदतवाढीसोबतच सरकारने महिलांसाठी(women) एक मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. आता लाभार्थी महिलांना ई-सेवा केंद्रांवर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्या घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत ई-केवायसी पूर्ण करू शकतात. यासाठी लाभार्थींनी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘ई-केवायसी’ पर्याय निवडावा लागणार आहे. आधार क्रमांक, ओटीपी पडताळणी आणि आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला कोड भरल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते. जर केवायसी आधीच झालेली असेल तर त्याबाबत स्क्रीनवर संदेश मिळणार आहे.
जून 2024 मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा केले जातात. आर्थिक स्वावलंबन आणि भविष्यात कर्जपुरवठ्याद्वारे स्वयंरोजगाराला चालना देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मात्र निवडणूक काळात काहींनी गैरप्रकार करून लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे.आता या मुदतवाढीमुळे अजूनही प्रक्रिया न केलेल्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि पात्र लाभार्थींना पुढील हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :
सोन्या चांदीचा दरात आजवरची सर्वात मोठी घसरण, 10 ग्रॅमचा भाव किती?
शेतकरी सहकारी संघा नंतर बंटी आणि मुन्ना पुन्हा एकत्र
बाचाबाचीवरुन हाणामारीपर्यंत पोहोचला भाजपा-शिंदेसेना वाद…