कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांपासून चमत्कारिक आणि वैचारिक व्यभिचाराने ठासून भरलेले राजकारण सुरू आहे.” तुमचं राजकारण घाला चुलीत”असे लोकांनी उद्वेगाने म्हणावे इतके अधःपतन इथे होताना दिसते आहे. कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नाही. ज्यांच्यामुळे काही कार्यकर्त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली त्यांनीच एकमेकांच्या गळ्यात गळा घातला आहे.कागल नंतर असे चित्र जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत(politics) दिसते आहे.एकेकाळी आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या आणि सध्या दिवाळखोरीकडे निघालेल्या शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्येकाँग्रेसचे सतेज पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिकहे राजकारणातले पारंपारिक शत्रू एकत्र आले होते. या दोघांचे एकत्र असलेले डिजिटल फलक लोकांना पाहायला मिळालेले होते.

महाडिक विरुद्ध पाटीलयांच्यातील राजकीय संघर्षाचीबिजे पाचगाव सारख्या करंगळीच्या नखा इतक्याग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या राजकारणातपेरली(politics) गेली होती. या दोन राजकीय घराण्याच्या संघर्षाची पाचगाव हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील छोटेसे गावराजधानी बनले होते. पाचगावचे रणक्षेत्र इतके गाजत होते आणि वाजत होते की या गावातील जाधव आणि पाटील या दोन घराण्यात रक्तरंजित संघर्ष उडाला होता.दोन्हीकडचे लोक या संघर्षात बळी पडले होते. आता हे दोन्ही गट आजन्म कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात गेले आहेत. आपल्या नेत्याच्या राजकीय अस्तित्वासाठीखून खराबा करून तुरुंगात गेलेल्या या कुटुंबांकडे दोन्ही गटाचे नेते नंतर फिरकले सुद्धा नाहीत.
शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत धनंजय महाडिक आणि सतेज पाटीलया दोघांचे एकत्रित फोटो पाहूनजिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला तेव्हा धक्का बसला होता. मात्र आताचा धक्का त्याहूनही मोठा आहे. जयसिंगपूर नगरपालिकेत महाडिक आणि पाटील हे दोघे एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. कागल मध्ये मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगेहे दोघेजण कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आल्यामुळे सर्वसामान्य जनतेला जेवढा धक्का बसला नाही तेवढा धक्का महाडिक आणि पाटील एकत्र आल्यामुळे बसलेला आहे.राज्याच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने जे घडत आहे तेच राज्यातील जिल्ह्यामध्ये सध्या घडताना दिसत आहे.
चंदगड मध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी अजितदादा गटाचे हसन मुश्रीफ आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या डॉक्टर नंदाताई बाभुळकरहे एकत्र आलेले आहेत. म्हणजे इथे महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र आल्याचे चित्र दिसते आहे.नगरपरिषद, नगरपंचायतआणि नगरपालिका निवडणुकीत विस्तव आडवा जात नसलेले राजकारणी एकत्र आलेले आहेत. त्यांच्या एकत्र येण्यामागे कोणतेही नैतिक अधिष्ठान नाही. तात्विक बैठक नाही. सत्तेत येणे हा एकमेव स्वार्थी विचार त्यामागे आहे. मग त्यासाठीकार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा असे एकाही नेत्याला वाटलेले नाही. सारे काही कार्यकर्त्यांना गृहीत धरून कालचे कट्टर शत्रू आज मित्र म्हणून एकत्र आलेले दिसतात. अर्थात हे कार्यकर्त्यांना अजिबात आवडलेले नाही.

हेही वाचा :
कॅल्शिअमच्या मुद्द्यात सगळ्यात पुढे! करा याचे सेवन, दूर होईल सर्व आजार
पाय घसरला अन् मिस जमैका स्टेजवरून पडली, झाला मोठा अपघात! रुग्णालयात केलं दाखल; Video Viral
लाडक्या बहीणींच्या पैशांवर डल्ला, आता कर्मचाऱ्यांना सरकारी ‘पाहुणचार’