महायुती सरकारच्या(government) महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चा नोव्हेंबरचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी घेतला आहे, सध्या त्यांची ई-केवायसी सुरू आहे.

मात्र, या योजनेत गैरप्रकार झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 5000 सरकारी (government)कर्मचारी, 3000 शिक्षक, तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी व पोलिसांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. या सर्वांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू आहे.
लाडकी बहीण योजनेत लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तरीही, अधिक उत्पन्न असलेल्या काही नागरिकांनी निवडणूक काळातील गडबडीचा फायदा घेत योजनेचा लाभ घेतला, तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केला.
सध्या या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया सुरु आहे. महिला व बालविकास विभागाकडून ही प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. ई-केवायसी न केल्यास भविष्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
योजनेचा गैरफायदा घेतलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून, त्यांनी लाटलेली रक्कम वसूल केली जाईल. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ रोखण्यासंदर्भातही पावले उचलली जातील. महिला व बालविकास विभागाकडून ही कारवाई संबंधित कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे.

हेही वाचा :
आशा सेविका बनली रिंकू राजगुरू; नेटकरी म्हणाले ‘तू चालत रहा पुढं..’
मृत्यूच्या शेवटच्या क्षणी माणसाच्या डोक्यात नेमका कोणता विचार येतो
दररोज गाजराचा ज्युस पिल्याने काय होते? खरंच वजन वाढते का