मराठी चित्रपटविश्वात नव्या उत्साहाची लाट निर्माण करणारा ‘आशा’ (Sevika)या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमधील प्रभावी टॅगलाइन “बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” ने प्रेक्षकांचा उत्साह वाढवला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन 19 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे आणि प्रदर्शनाआधीच ‘आशा’ने आपली ताकद सिद्ध केली आहे.

61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार जिंकून ‘आशा’ने समीक्षकांची दाद मिळवली आहे. चित्रपटाची कथा महिलांच्या संघर्ष, आत्मविश्वास आणि समाजातील जबाबदारीवर आधारित आहे. कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका, ज्याची भूमिका साकारत आहे लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू.
रिंकू सोबत चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. रिंकूने साकारलेली ‘आशा’ ही फक्त आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी नसून, प्रत्येक महिला आणि कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी ताकद, या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात,
“‘आशा’ हा चित्रपट फक्त आरोग्य सेविकांचा(Sevika) नाही, तर घर सांभाळत, घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, जिद्दीचा हा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”
चित्रपटाचे निर्माता आहेत कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील, तर सहनिर्माते मुरलीधर चटवानी आणि रवींद्र अवटी आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक अनोखी, नाविन्यपूर्ण कथा अनुभवायला देणार आहे.

हेही वाचा :
मृत्यूच्या शेवटच्या क्षणी माणसाच्या डोक्यात नेमका कोणता विचार येतो
दररोज गाजराचा ज्युस पिल्याने काय होते? खरंच वजन वाढते का
गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी… Video Viral