गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ असून याचा समावेश 18 पुराणांमध्ये केला गेला आहे. मृत्यू नंतर आत्म्याचा प्रवास, कर्मांचे फळ आणि पापासाठी होणाऱ्या शिक्षा यांचे सविस्तर वर्णन गरुड पुराणामध्ये केले आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर 13 दिवस गरुड पुराण वाचले किंवा ऐकवले जातात, ज्यामुळे मृत(death) आत्म्यास शांती मिळते, अशी हिंदू धर्मशास्त्रात मान्यता आहे.

गरुड पुराणानुसार, मृत्यू हा अंतिम सत्य आहे, परंतु व्यक्ती प्राणी मृत्यूला सहज स्वीकारत नाही. मृत्यूच्या वेळी आत्मा शरीर सोडतो, परंतु शरीराचा मोह ताबा सोडत नाही. मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणी त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व कर्म एका क्षणात त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहतात. मृत्यू(death) झाल्यानंतर आत्मा शरीरापासून मुक्त होतो, परंतु त्याला त्याची परिस्थिती समजायला काही काळ लागतो. आत्मा ज्या ठिकाणी मृत्यू झाला तिथे काही काळ असतो आणि त्याला परिचितांचे आवाज ऐकू येतात, मात्र संवाद साधता येत नाही.
शरीर जाळल्यावर आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. गरुड पुराणानुसार, व्यक्तीचे पूर्वकर्म ठरवतात की त्याला स्वर्ग मिळेल की नरक. नरकातील शिक्षा त्या कर्मानुसार ठरवली जातात. गरुड पुराण मृत्यू नंतरच्या जीवनातील कर्म, शांती आणि आत्म्याच्या प्रवासाबाबत मार्गदर्शन करणारा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.

हेही वाचा :
गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी… Video Viral
५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच…
महापालिका निवडणुकीत मनसे व ठाकरे गटाची युती निश्चित…