वास्तुशास्त्र हे घराशी संबंधित प्राचीन शास्त्र आहे, ज्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. घर वास्तुदोषमुक्त नसेल, तर आर्थिक (money)अडचणी, आरोग्य समस्या, गृहकलह अशा अडचणी येऊ शकतात, अशी मान्यता आहे. अनेकदा आपल्या रोजच्या आयुष्यात होणाऱ्या छोट्या चुकाही घरात वास्तुदोष निर्माण करतात. या दोषांपासून मुक्त राहण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सुचवलेले आहेत, ज्यापैकी एक प्रभावी उपाय म्हणजे घोड्याची नाल.

वास्तुशास्त्रानुसार घोड्याची नाल अत्यंत पवित्र मानली जाते. घोड्याच्या पायाला पळताना दुखापत होऊ नये यासाठी अर्धगोल आकाराची लोखंडी पट्टी (नाल) ठोकली जाते. ही नाल जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर लावली गेली, तर घरात प्रवेश करणाऱ्या सर्व नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते आणि कोणाचीही नजर घरावर लागत नाही.

वास्तुशास्त्रात असेही सांगितले आहे की, ज्य घरात मुख्य दरवाज्यावर घोड्याची नाल असते, त्या घरात कधीही पैशांची तंगी येत नाही. तिजोरी सदैव भरलेली राहते आणि आर्थिक (money)स्थैर्य टिकते. तसेच, घरात वाईट ऊर्जा येऊ शकत नाही, परिणामी घरात शांतता आणि समाधान राहते.घराच्या सकारात्मक उर्जेसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी ही एक सोपी पण परिणामकारक वास्तुशास्त्रीय उपाय म्हणून घोड्याची नाल घराच्या मुख्य दरवाज्यावर लावणे अत्यंत फायदेशीर ठरते.

हेही वाचा :

मारूती कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी…
स्मृती मंधानाचं आलिशान घर तुम्ही पाहिलं का? फोटो आले समोर
“कौन राज ठाकरे? कौन अविनाश जाधव?”, रिक्षाचालकाचा दारूधुंद धुडगूस