भारतीय महिला क्रिकेट(cricket) संघाची स्टार ओपनर आणि क्रिकेटप्रेमींची लाडकी स्मृती मंधाना गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. संगीतकार आणि गायक पलाश मुच्छलसोबत तिचं लग्न 23 नोव्हेंबरला सांगलीत होणार होतं. लग्नाच्या तयारीला पूर्ण जोर मिळाला होता आणि साखरपुडा, हळद यांसारख्या विधींनाही संघातील खेळाडूंसह बॉलिवूड आणि स्पोर्ट्स इंडस्ट्रीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मात्र लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अनपेक्षित घटनेमुळे स्मृतीने तिचा विवाह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

या लग्नाची आणखी एक मोठी चर्चा म्हणजे स्मृती(cricket) मंधानाचं नवं आलिशान घर. सांगलीजवळील शांत परिसरात उभारण्यात आलेलं हे घर दिसायलाच नव्हे तर सजावटीतही एखाद्या बॉलिवूड सिनेमाच्या सेटची आठवण करून देणारं आहे. स्मृतीने याबाबत एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती दिग्दर्शक करण जोहरची मोठी चाहती आहे आणि त्यामुळे घराच्या प्रवेशद्वाराला भव्य आणि फिल्मी टच देण्यात आला आहे.
प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर जतिन सप्रू यांच्यासोबतच्या मुलाखतीत स्मृतीने घराची झलकही दाखवली होती. तेव्हापासून हे घर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. स्मृती-पलाशच्या लग्नातील फोटो आणि हळदीच्या कार्यक्रमाचे चित्रण याच प्रवेशद्वारासमोर झाले होते.स्मृती तिच्या वडिलांच्या खूप जवळ असल्याचं अनेक व्हिडिओ आणि मुलाखतीतून दिसून आलं आहे. तिच्या वडिलांनी नेहमीच मुलीच्या स्वप्नांना हातभार लावला. एका जुन्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, “स्मृतीने तिच्या आईचा ओरडा खाल्ला असेल, पण मी कधीच रागावलो नाही. तिने जे मागितलं, ते तिच्या स्वप्नांसाठी दिलं.” याच प्रेमाचं प्रतीक म्हणून घरात स्मृतीचे अनेक फोटो मोठ्या फ्रेममध्ये लावण्यात आले आहेत.
मात्र वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर स्मृतीने कोणताही विचार न करता लग्न पुढे ढकललं. तिच्यासाठी वडिलांपेक्षा महत्त्वाचं काहीच नसल्याचं तिने जवळच्या मंडळींना स्पष्ट सांगितलं. यामुळे एक भावनिक आणि आदर्श उदाहरण लोकांसमोर आलं आहे.

हेही वाचा :
“कौन राज ठाकरे? कौन अविनाश जाधव?”, रिक्षाचालकाचा दारूधुंद धुडगूस
अमित ठाकरे अन् पार्थ पवारांची तुलना! राज ठाकरेंच्या पक्षाचा टोला; ‘1800 कोटींच्या…
कोल्हापूर मधील गगनबावड्यात बिबट्याची दहशत; वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी, ग्रामस्थांची मागणी