भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून विभक्त झाल्यानंतर सानिया तिच्या मुलगा इजहानसोबत दुबईत राहते. 2024 मध्ये अचानक झालेल्या विभक्तीनंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्रीशी विवाह केल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ (divorce)उडाली. तर दुसरीकडे सानिया मात्र शांत राहून वैयक्तिक बाबींवर भाष्य टाळत होती. मात्र अलीकडे एका पॉडकास्टमध्ये दिग्दर्शिका फराह खानसोबत संवाद साधताना सानियाने तिच्या आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.

या पॉडकास्टमध्ये सानियाने सांगितले की, तिच्या मुलगा इजहानच्या जन्मानंतर तिने एग्स फ्रीज केले होते. तिने स्पष्टपणे सांगितले की, वाढत्या वयानुसार महिलांची बायोलॉजिकल क्लॉक बदलते आणि त्यामुळे भविष्यात मातृत्वाचा पर्याय उघडा ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा होता. सानियाने सांगितले की, या प्रक्रियेसाठी तिने फराह खानच्या मदतीने तज्ज्ञ फिरोजा पारीख यांच्याशी संपर्क साधला.
पहिली प्रेग्नन्सी नैसर्गिकरित्या झाली होती आणि तिला आणखी एक बाळ हवे होते, हेही सानियाच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. तिने महिलांना संदेश देत म्हटले, “करिअर, नातेसंबंध (divorce)किंवा आयुष्यातील परिस्थिती काहीही असली तरी मातृत्वाचा निर्णय हा स्त्रीचा अधिकार आणि तिची वेळ महत्त्वाची असते. त्यामुळे शक्य असल्यास एग्स फ्रीज करणे हा एक पर्याय नक्की विचारात घ्यावा.”
घटस्फोटानंतर बराच काळ सानिया भावनिकदृष्ट्या कठीण काळातून गेली असल्याचे संकेत तिने वैयक्तिक पोस्ट्समधून देत होती. मात्र आता ती स्वतःबद्दल मोकळेपणाने बोलत असून पुढील आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवताना दिसत आहे. तिच्या या नव्या खुलाशामुळे पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा :
चक्रीवादळाचा हाय अलर्ट, राज्यात मुसळधार पाऊस, वेगाने येतंय संकट, 25 ते 27 नोव्हेंबर..
घराच्या उंबरठ्यावर लावा ही छोटीशी गोष्ट, आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत
आतड्यांच्या आरोग्यासाठी ‘ही’ चार फळे सर्वोत्तम!