राज्यात तसेच देशात हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात थंडी कमी झाली असून उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय हवामान (weather)विभागाच्या माहितीनुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली असून अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा जाणवतो आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाल्याने थंडीचा प्रभाव घटला आहे. त्याचवेळी पूर्वेकडून येणारे उबदार वारे आणि वाढलेली आर्द्रता यामुळे पुढील पाच ते सात दिवस गारवा अनुभवता येणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने संभाव्य चक्रीवादळाचा इशारा दिला असून बंगालच्या उपसागरात तयार झालेली हवामान प्रणाली वेगाने सक्रिय होत आहे. आगामी काही दिवसांत(weather) ही प्रणाली शक्तिशाली चक्रीवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे. या हवामान बदलाचा परिणाम म्हणून केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि किनारी आंध्र प्रदेश येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः 25 ते 27 नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडूत जोरदार पाऊस तर 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान अतिवृष्टीसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे.

याचदरम्यान उत्तरेकडील दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये प्रदूषणाची परिस्थिती गंभीर झाली आहे. वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला असून श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एकूणच, देशात हवामान बदलाचे स्वरूप तीव्र होत असून त्याचा परिणाम सामान्य जनजीवनावर आणि आरोग्यावर जाणवू लागला आहे.

हेही वाचा :

घराच्या उंबरठ्यावर लावा ही छोटीशी गोष्ट, आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत
आतड्यांच्या आरोग्यासाठी ‘ही’ चार फळे सर्वोत्तम!
मारूती कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी…