इथिओपियातील हेले गुब्बी ज्वालामुखीचा(eruption) जोरदार उद्रेक झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. मध्यरात्री समुद्री मार्गे वाहत आलेली ज्वालामुखीची राख भारतात पोहोचताच अनेक राज्यांमध्ये हवेची गुणवत्ता काही तासांतच गंभीर पातळीवर पोहोचली. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात हवेतील राखेचे कण स्पष्टपणे जाणवत होते. अचानक वाढलेल्या या प्रदूषणाने तब्बल 447 च्या जोखीमस्तरालाही ओलांडले असून अनेक जिल्ह्यांमध्ये AQI ‘गंभीर’ श्रेणीत नोंदवला गेला आहे.

दिल्लीमधील प्रदूषण आधीच गंभीर स्थितीत होते, मात्र ज्वालामुखीच्या (eruption)राखेच्या ढगांनी परिस्थिती आणखीच बिघडवली. उपग्रह डेटामधून स्पष्ट झाले आहे की, ज्वालामुखीच्या राखेच्या हालचालीचे ढग मोठ्या प्रमाणात भारतात दाखल झाले आहेत. देशातील तब्बल 50 सर्वाधिक प्रदूषित जिल्ह्यांपैकी निम्मे जिल्हे दिल्ली आणि आसाममध्ये आहेत. हवेत मोठ्या प्रमाणात सूक्ष्म कण मिसळल्यामुळे दृष्यमानता घटली आणि मानवी आरोग्यावर मोठे परिणाम पाहायला मिळाले.

प्रदूषणाची स्थिती गंभीर होताच दिल्लीसह अनेक शहरांनी तातडीचे निर्णय घेतले आहेत. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांना तातडीने ऑनलाईन वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नसलेल्या शाळांना एक दिवसाची सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

हवामान आणि प्रदूषणाशी संबंधित स्टेज-3 प्रोटोकॉल लागू करत दिल्ली सरकारने सरकारी आणि खासगी कार्यालयांना 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच ऑफिसमध्ये बोलावण्याचे आदेश जारी केले आहेत. उर्वरित 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांना बाहेर पडताना मास्कचा वापर करण्याचे आणि शक्यतो घराबाहेर अनावश्यक जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्वालामुखीच्या राखेमुळे उड्डाणांनाही मोठा धोका निर्माण झाला. विमानांच्या इंजिनमध्ये राखेचे कण शिरल्यास इंजिन बंद पडण्याची शक्यता असल्याने काही विमान कंपन्यांनी तातडीने उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. काही विमानांना वळवावे लागले, तर काहींना उशीराने उड्डाण करावे लागले. हवेतील राखेच्या थरामुळे आकाश धूसर दिसत असून हवाई सेवा पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे(eruption).

CREA च्या वार्षिक प्रदूषण अहवालानुसार, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यानंतरही हवा प्रदूषित राहिली होतीच; मात्र ज्वालामुखीच्या राखेमुळे प्रदूषणाचा दर आणखी झपाट्याने वाढला आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे दिसत होते, आणि त्याच पार्श्वभूमीवर या राखेच्या ढगाने प्रदूषणात विक्रमी वाढ केली आहे. AQI 400 पेक्षा जास्त नोंदवल्यामुळे अनेक शहरांमध्ये आरोग्य इशारे जारी करण्यात आले आहेत.

लोकांना डोळे, घसा, श्वसनमार्गात त्रास, श्वास घेण्यास अडचण, दम्याचा त्रास वाढणे यांसारख्या समस्या जाणवत आहेत. तज्ज्ञांनी विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. ज्वालामुखीच्या राखेमुळे होणारा हा प्रदूषणाचा वाढता धोका अजून 48 तास कायम राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा :

हळदी सोहळ्यात रॉयल एंट्री घेताच हायड्रोजन फुगे फुटले अन् बाहेर पडल्या आगीच्या ज्वाळा; Video Viral
लग्न पुढे ढकलण्यापासून ते फ्लर्टींचे चॅट्स, ‘त्या’ 72 तासांत नको के घडलं…
थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट