भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि सुप्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांचं 23 नोव्हेंबर रोजी होणारं लग्न(wedding) संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलं होतं. दोघांनी काही दिवसांपूर्वीच साखरपुड्याची अधिकृत घोषणा केल्यामुळे चाहते उत्सुकतेने विवाह सोहळ्याची वाट पाहत होते. मात्र, अचानक समोर आलेल्या घटनांनी दोघांच्या नात्याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. गेल्या 72 तासांत जे काही घडलं, त्याने चाहत्यांमध्ये संभ्रम आणि चर्चांना उधाण आले आहे.

20 नोव्हेंबर रोजी स्मृतीने इंस्टाग्रामवर रील पोस्ट करत पलाशसोबतचा साखरपुडा जाहीर केला. ‘समझो हो ही गया…’ या गाण्यावर टीममधील खेळाडूं सोबत नाचताना स्मृती दिसली आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. दुसऱ्या दिवशी, 21 नोव्हेंबरला पलाशने स्मृतीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये नेलं आणि तिथेच अंगठी घालत तिला लग्नासाठी मागणी घातली. या रोमँटिक क्षणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

यानंतर स्मृती–पलाशच्या(wedding) हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. भारतीय महिला संघातील अनेक खेळाडू देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसले. मात्र 23 नोव्हेंबरला, ज्या दिवशी लग्न होणार होते, त्याच दिवशी अचानक लग्न पुढे ढकलल्याची माहिती मिळाली. स्मृतीचे मॅनेजर तुहीन मिश्रा यांनी सांगितले की, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

24 नोव्हेंबरला सकाळी आणखी एक धक्का बसला—पलाश मुच्छल यांचीही तब्येत बिघडली. त्यांना सुरुवातीला सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर ते मुंबईला हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. याचदरम्यान सोशल मीडियावर विविध अफवा पसरू लागल्या. संध्याकाळपर्यंत स्मृतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पलाशसोबतचे सर्व फोटो आणि व्हिडिओ हटवल्याने ही चर्चा अधिक पेटली.

प्रकरणाला वेगळं वळण तेव्हा मिळालं, जेव्हा एका Reddit युजरने काही चॅट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल केले. दावा केला जात आहे की हे चॅट्स पलाश आणि एका ‘मॅरी डी-कोस्टा’ नावाच्या महिलेतील आहेत. मे 2025 मधील या कथित संदेशांमध्ये दोघांमध्ये भेटण्याबद्दल, पोहण्याबद्दल चर्चा झाल्याचे दिसत असल्याचा दावा केला गेला. तथापि, या चॅट्सची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही आणि संबंधित अकाउंट्स हटवण्यात आलेले आहेत.सध्या सोशल मीडियावर स्मृती आणि पलाश यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. लग्न पुढे ढकलण्यामागे नेमकं काय कारण आहे, याची अधिकृत माहिती लवकरच मिळण्याची शक्यता असून चाहते दोघांच्या प्रकृतीबाबतही चिंतित आहेत.

हेही वाचा :

थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट
शिवनाकवाडीचा अभिमान! श्रेयश खोत पहिल्याच प्रयत्नात मराठा रेजिमेंट सेंटर, बेळगाव येथे निवड
महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर