भारताची स्टार ओपनर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाला फक्त काही तास बाकी असताना घडलेल्या घटनांनी सर्वांना थक्क केले आहे. लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि विवाह पुढे ढकलावा लागला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पलाशदेखील आजारी पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण या वैयक्तिक संकटांदरम्यान चक्क एका कोरिओग्राफरसोबत पलाशचे फ्लर्टिंगचे मेसेजेस व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. मेरी डिकोस्टा नावाच्या कोरिओग्राफरच्या नावाने पलाशसोबतचे चॅट्स(messages) व्हायरल झाले होते. या चॅट्समध्ये पलाश तिला सतत मेसेज करताना, फ्लर्ट करताना दिसत होता. त्यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या रिलेशनशिपमध्ये फूट पडली का, असा प्रश्न चाहत्यांना पडला. अखेर अनेक दिवसांच्या चर्चेनंतर मेरी डिकोस्टा स्वतः समोर आली असून तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे महत्वाची पोस्ट शेअर केली आहे.

चॅट्स व्हायरल झाल्यावर पलाशविरोधात नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. स्मृतीच्या चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केला. मात्र आता मेरी डिकोस्टाने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेला नवीन वळण मिळालं आहे. “हा मुद्दा लक्षात घ्या: मी त्याला कधीच भेटले नाही”, असं ती स्पष्टपणे म्हणाली आहे. म्हणजेच भेट नसतानाही पलाशने तिच्या डीएममध्ये मेसेज कसे केले? आणि तो स्वतः एका स्थिर नात्यात असूनही तीच्याशी फ्लर्ट का करत होता? या प्रश्नांची सरबत्ती नेटकऱ्यांकडून सुरू झाली आहे.
व्हायरल झालेल्या चॅट्समध्ये (messages)पलाश तिला पोहायला जाण्याचं सांगतो, तर तिच्या नात्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं टाळतो. उलट भेटण्यासाठी तिने होकार द्यावा, यासाठी तो सातत्याने प्रयत्न करतो. त्यामुळे हे मेसेज ‘फेक’ की ‘रियल’? यावरही सोशल मीडियावर वादंग सुरू आहे. कारण मेरीने आता दिलेला यू-टर्न अनेकांना संशयास्पद वाटत आहे.

या प्रकरणाचा सर्वाधिक परिणाम स्मृती मानधनावर झाला आहे. तिने अचानक लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट साखरपुड्याची रील, प्रपोजलचा व्हिडिओ, फोटोशूट—इन्स्टाग्रामवरून हटवले आहेत. यानंतर चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली: “स्मृती आणि पलाशचे लग्न होणार की नाही?” दरम्यान, स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची तब्येत सुधारत आहे. पण लग्नाच्या नव्या तारखेबाबत स्मृती किंवा पलाशकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पलाशच्या बाजूनेही चॅट्सबाबत कोणताही खुलासा झालेला नाही.

क्रीडा आणि संगीत क्षेत्रातील ही चर्चेतली जोडी सध्या वैयक्तिक आयुष्याच्या सर्वांत मोठ्या वळणावर आहे. मेरी डिकोस्टाच्या पोस्टनंतर प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं असून चाहत्यांचे लक्ष आता स्मृती आणि पलाश यांच्या प्रतिक्रियेवर खिळलं आहे.

हेही वाचा :

मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं… शिंदेंच्या मंत्र्याच्या विधानाची राज्यभरात चर्चा!
आता बनवता येणार नाही Fake आधार कार्ड आणि पॅन कार्ड…
शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्….