राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या(elections) प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भगूरमध्ये प्रचारसभेत भाषण दिले.सभेत बोलताना पाटील यांनी मतदारांना एक अनोखा सल्ला दिला. त्यांनी म्हटले, “विरोधकांचे मटण खा आणि बटण आमचं दाबा.” त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये गजबज निर्माण झाली. पाटील म्हणाले की, भगूर नगरपालिकेत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली खूप कामे झाली आहेत आणि विरोधक कितीही एकत्र येऊन प्रचार करतात तरी जनता प्रतिमा आणि काम पाहून मतदान करेल.

गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर थेट टीका करत म्हणाले की, “त्यांच्याकडे फक्त पैसा आहे, लोकांनी कुणाचा बँड वाजवायचा हे ठरवले आहे. विधानसभा निवडणुकीत लक्ष्मी (elections)आली होती, आताही तुम्हाला लक्ष्मी मिळेल, त्यामुळे घराबाहेर झोपा.”ते पुढे म्हणाले की, “मी मतदारसंघात बौद्ध विहाराची कामे केली, सर्व समाजासाठी कामे केली. शिंदे साहेबांनी 350 कोटी रुपये मतदारसंघात दिले. आमच्याकडे सरळ शिवसेना आहे, रात्री 4 वाजेपर्यंत सरकारचे काम करणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे. आम्हाला गद्दार म्हणायचे, खोके काय काय ऐकावे लागले, पण आम्ही निवडून आलो आणि मंत्रीही झालो.”
मंत्री पाटील यांनी महायुतीवर बोलताना स्पष्ट केले की, “पॉलिसी शिंदे साहेब ठरवतात, आम्ही आदेशावर चालणारे लोक आहोत. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. शिवसेना आपल्या पद्धतीने लढते, प्रचारात आम्ही कुठेही टीका केली नाही, टीका केली तर ती आम्ही करत नाही.”

हेही वाचा :
आता बनवता येणार नाही Fake आधार कार्ड आणि पॅन कार्ड…
शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्….
सदोष मतदार याद्यांचा घोळ कठोर कारवाईची गरज..!