कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (elections)प्रक्रिया जिथे जिथे चालू झाली आहे तिथे तिथे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाला असल्याचे समोर येत असून या मतदार याद्या बनवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांचे हेलाजिरवाणे अपयश आहे असे म्हणावे लागेल. विशेष म्हणजे या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या कडूनही तक्रारी केल्या जात आहेत. या एकूण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. कारवाई होणार किंवा होते आहे हे एकदा लक्षात आल्यानंतर पुन्हा मतदार याद्या तयार करण्याचे कामअधिक काळजीने आणि प्रामाणिकपणे केले जाईल.कोल्हापूर जिल्ह्यातही नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इथे सुद्धा मतदार यादी मध्ये प्रचंड प्रमाणावर घोळ आहे पण आता तो दुरुस्त करण्या पलीकडचा आहे.

मात्र महापालिका निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादी मधील हरकती घेण्यासाठी दिली गेलेली अंतिम तारीख वाढवून देण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या.त्यावर हरकती आणि सूचना घेण्यासाठी दिनांक 27 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अवघ्या सात दिवसात हरकती आणि सूचना केल्या जाणे कठीण आहे. कारण याद्या मध्येच प्रचंड घोळ आहे. त्या तपासून पाहून हरकती घेण्यासाठी मुदत वाढवून देणे नैसर्गिक न्यायाचे ठरणार आहे.मतदार यादी दुरुस्ती प्रक्रिया सोप्या पद्धतीने केली जावी, मतदार यादी मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात यावी, दुरुस्तीसाठी अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी कोल्हापुरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या कडून करण्यात आली आहे. मतदार यादी राजकीय दबावाखाली तयार करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी महापालिका प्रशासक के मंजू लक्ष्मी यांच्याकडे केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सदोष मतदार याद्यांच्या बद्दल विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्ष यांच्याकडून निवडणूक आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी तर मतदार याद्यांतील घोळ काढून टाकेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.महायुती मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे एक नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मतदार यादीवर आक्षेप घेतला आहे.एकाच घरामध्ये 169 मतदार कसे असू शकतात असा त्यांनी सवाल उपस्थित केला आहे तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी 70 हजार मतांचे धारावी कडे स्थलांतर झाल्याबद्दल चा अतिशय गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे.निवडणूक आयोगाचा एक भाग असलेल्या निवडणूक कार्यालयाकडूनमतदार याद्या तयार केल्या जातात. नवीन मतदार नोंदणी, मतदार यादी दुरुस्ती,मृत झालेल्या मतदारांची नावे वगळणे, अशी प्रक्रिया या कार्यालयाकडून सतत सुरू असते.
या एकूण प्रक्रियेमध्ये किती कर्मचारी नियुक्त करण्यात आले, ते कोणत्या विभागातील आहेत, त्यांची नावे काय याची सर्व माहितीनिवडणूक विभागाकडे असते. त्यामुळे सदोष मतदार (elections)यादी करणारे नेमके कर्मचारी आणि अधिकारी कोण आहेत हे निवडणूक आयुक्तांना चौकशी केली तर माहीत होऊ शकते. आणि म्हणूनच त्यांच्याकडून संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाईचा बडगाउगारणे अपेक्षित आहे.मतदार यादी बद्दल सर्वसामान्य मतदारांनी अतिशय जागरूक असले पाहिजे. कोणतीही निवडणूक जाहीर होण्याच्या आधी मतदार यादी मध्ये आपले नाव आहे काय? ते दुसरीकडे कुठे नोंदवले गेले आहे काय?नाव चुकीचे पडले आहे काय? याची माहिती मतदारांनी घेतली पाहिजे.आपण जागरूक राहायचे नाही आणि मतदार यादी जाहीर झाल्यानंतर, ती कायम झाल्यानंतर आपले नाव चुकीचे पडले आहे अशी तक्रार करण्यात काही अर्थ नाही. जशी सरकारची जबाबदारी आहे तसेच ती सर्वसामान्य मतदारांची सुद्धा आहे. मतदार जागृत असेल तर सदोष मतदार याद्या अस्तित्वात येणार नाहीत.

हेही वाचा :
हळदी सोहळ्यात रॉयल एंट्री घेताच हायड्रोजन फुगे फुटले अन् बाहेर पडल्या आगीच्या ज्वाळा; Video Viral
लग्न पुढे ढकलण्यापासून ते फ्लर्टींचे चॅट्स, ‘त्या’ 72 तासांत नको के घडलं…
थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट