लग्नसमारंभ हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. सोशल मिडियावर सध्या लग्नसमारंभांचे नवनवीन ट्रेंड सुरु आहेत. प्रत्येकाला लग्नमंडपात खास आणि राॅयल एंट्री हवी असते पण प्रत्येकवेळी आपल्याला जसे हवे असते तसे घडून येत नाही. असेच काहीसे आताच्या व्हिडिओमध्येही घडून आल्याचे दिसून आले. वधूने ट्रेंड पाहून हळदी समारंभात एक खास एंट्री घेऊ पाहिली खरी पण घडलं काही भलतंच(couple). रंगीबेरंगी हायड्रोजन फुग्यांसह वधूने यात एंट्री घेतल्याचे दिसले, ती आनंदी होती पण हा तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही आणि काही क्षणातच मोठा अपघात घडला. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

हा व्हिडिओ दिल्लीतील एका हळदी सोहळ्यातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये वधू आणि वर काही वऱ्हाड्यांसह एंट्री घेताना दिसते. यावेळी एकाने रंगीबेरंगी हायड्रोजन फुग्यांचा गुच्छ पकडलेला असतो, सर्वांच्या चेहऱ्यावर सोहळ्यासाठीचा आनंद असतो पण तितक्यातच अचानक हे फुगे फुटतात आणि तिथे एक मोठा स्फोट होतो. या स्फोटात वधू आणि वरसह अनेकांना दुखापत झाली आणि घटनास्थळी गोंधळ उडाला.याचा व्हिडिओ @Incognito_qfs नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देत लिहिण्यात आले आहे की,’एका जोडप्याने त्यांच्या हळदीच्या उत्सवात हायड्रोजन फुगे वापरले. त्यांच्या भव्य प्रवेशादरम्यान फुगे फुटले आणि वधू आणि वर दोघेही भाजले. ते एका प्रकारच्या “व्हायरल ट्रेंड” चे अनुसरण करत होते आणि शेवटी त्यांच्या योजना उध्वस्त झाल्या’.
अशा चुका टाळण्यासाठी जागरूकता निर्माण(couple) करत पुढे लिहिण्यात आले की, ‘फुग्यांमध्ये हायड्रोजन वापरणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. ते ज्वलनशील आहे आणि अगदी लहानशा ठिणगीमुळेही स्फोट होऊ शकतो. सहसा लोक फुग्यांमध्ये हेलियम वापरतात. हेलियम हा एक निष्क्रिय वायू आहे आणि तो प्रतिक्रिया देत नाही. परंतु, हायड्रोजन हेलियमपेक्षा हलका आहे आणि फुग्यांना चांगला उचलतो. हायड्रोजन देखील स्वस्त आहे. काही बावळट लोकांनी त्यांच्या एका रीलमध्ये ते वापरले असेल आणि ते व्हायरल झाले असतील. विज्ञानाचे मूलभूत ज्ञान तुम्हाला पूर्णपणे टाळता येण्याजोग्या अपघातांपासून वाचवू शकते. व्हायरल ट्रेंडचे अनुसरण करण्यापूर्वी नेहमीच तुमच्या मेंदूचा वापर करा’.
A couple used Hydrogen Balloons in their Haldi celebration. The balloons exploded during their grand entry and left both the bride and groom with burns.
— Incognito (@Incognito_qfs) November 24, 2025
They were following some sort of "viral trend" and ended up ruining their plans.
Using Hydrogen in balloons is absolutely… pic.twitter.com/qhazUxNVlS
दरम्यान व्हिडिओतील या दृश्यांवर यूजर्सनेही नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले. . एका युजरने लिहिले आहे, “लोक या वेड्या व्हायरल ट्रेंड्सचा फॉलो करण्याऐवजी आपल्या सुंदर पारंपारिक भारतीय शैलीतील लग्नांना का चिकटून राहू शकत नाहीत याचे आश्चर्य वाटते. काही गोष्टी आहेत तशाच चांगल्या वाटतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांनी हायड्रोजन बॉम्बच कधी नाव ऐकलं नव्हतं का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “समाजात रसायनशास्त्राचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे”.

हेही वाचा :
लग्न पुढे ढकलण्यापासून ते फ्लर्टींचे चॅट्स, ‘त्या’ 72 तासांत नको के घडलं…
थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट
शिवनाकवाडीचा अभिमान! श्रेयश खोत पहिल्याच प्रयत्नात मराठा रेजिमेंट सेंटर, बेळगाव येथे निवड