इंटरनेट एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक मजेदार आणि थक्क करणारे व्हिडिओज(video) शेअर केले जातात. आताही इथे असाच व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक माणूस अजगरांच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. अजगर जो जंगलातील एक विशालकाय प्राणी आहे, जो एका क्षणातच तो कोणत्याही प्राण्याला किंवा माणसाला गिळंकृत करु शकतो. अजगराला पाहताच लोक आपला जीव वाचवण्यासाठी त्याच्यापासून पळ काढू लागतात पण व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दृश्य काहीसे वेगळे होते. व्हिडिओमध्ये व्यक्ती अनेक अजगरांच्या मधोमध जाऊन झोपला आहे आणि यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भिती नसून एक निखळ हास्य दिसून येत आहे. व्हिडिओतील ही दृश्ये सर्वांनाच धक्का देणारी असून यात नक्की काय घडलंय ते चला सविस्तर जाणून घेऊया.

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती महाकाय अजगरांच्या मधोमध आरामात झोपल्याचे दिसून येते. त्याच्या चारही बाजूला अजगरांचा सडा पडलेला असतो. मुख्य म्हणजे, हे सर्व अजगर जिवंत असतात आणि असे असतानाही व्यक्ती अजिबात घाबरत नाही. व्हिडिओमध्ये(video) व्यक्तीचे तोंड सोडल्यास उरलेले संपूर्ण अजगरांच्या विळख्यात अडकल्याचे दिसते. हे सर्व दृश्य मनाला भिती देत असतानाच अचानक वर बसलेले अजगर देखील व्यक्तीच्या अंगावर पडतात. व्यक्ती तरीही शांत राहून कॅमेराकडे बघत आपले बालणे सुरुच ठेवतो. व्हिडिओतील ही दृश्ये खरोखर धोेकादायक आणि भितीदायक वाटत असून व्यक्तीच्या हिमतीवर आता लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हा व्यक्ती अमेरेकीतील एक रहिवासी असून त्याचे नाव ब्रेवर असे आहे. तो कॅलिफोर्नियामध्ये प्रीहिस्टोरिक पेट्स नावाचे प्राणीसंग्रहालय चालवतो जिथे सर्व प्रकारचे सरपटणारे प्राणी ठेवले जातात. ब्रेवर धोकादायक प्राण्यांसोबत मजा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतो. हा व्हायरल व्हिडिओ @jayprehistoricpets नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला वाटतं स्वप्न जगण्याच्या आपल्या आवृत्त्या खूप वेगळ्या आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा, किती सुंदर आहेत, मला त्यापैकी किमान दोन तरी मिळतील का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्यक्तीला सुसाईड करायचं होतं का?”.

हेही वाचा :
थंडीत दररोज एक संत्री खाल्ल्यास काय होते?
ऐश्वर्या राय प्रथमच धर्म आणि जातीवर स्पष्टपणे बोलली, फक्त एका शब्दात म्हणाली…
सानिया मिर्झा हिचा घटस्फोटानंतर दुसऱ्या बाळाबद्दल अत्यंत मोठा खुलासा