हिवाळा सुरू होताच बाजारात संत्र्यांचा(orange) बहर दिसू लागतो आणि हे फळ केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त मानले जाते. तज्ञांच्या मते, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि विविध खनिजे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. दररोज एक संत्री खाल्ल्यास सर्दी-खोकला आणि हंगामी संसर्गापासून बचाव होऊ शकतो.

संत्र्यामध्ये विटॅमिन ए, बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कोलीनसारखी पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. नियमितपणे महिनाभर संत्र्याचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात.विशेष म्हणजे, संत्र्याचे (orange)सेवन त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन सीमुळे कोलेजन उत्पादन वाढते आणि त्वचा अधिक निरोगी व चमकदार दिसते. तर संत्र्यातील फायबर पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
आरोग्य तज्ञांचे मत आहे की, हिवाळ्यात दररोज एक संत्री खाणे म्हणजे नैसर्गिक औषधासारखेच असून, हे शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी उपयोगी ठरते.

हेही वाचा :
चक्रीवादळाचा हाय अलर्ट, राज्यात मुसळधार पाऊस, वेगाने येतंय संकट, 25 ते 27 नोव्हेंबर..
घराच्या उंबरठ्यावर लावा ही छोटीशी गोष्ट, आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत
आतड्यांच्या आरोग्यासाठी ‘ही’ चार फळे सर्वोत्तम!