स्वयंपाक घरातील सुरक्षिततेसाठी एलपीजी सिलेंडरच्या (cylinders)काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात गॅसचा वास येणे ही गंभीर बाब असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात होऊ शकतो. एलपीजीमध्ये इथाइल मर्कॅप्टन मिसळलेले असते, ज्यामुळे गॅस गळती झाल्यास कुजलेल्या अंडी किंवा लसूणसारखा वास येतो. अशा परिस्थितीत ताबडतोब बर्नर आणि रेग्युलेटरवरील सर्व नॉब बंद करावेत आणि घरातील सर्व खिडक्या व दरवाजे उघडे करून हवादार करावे.

गॅसचा वास येताना मेणबत्ती, अगरबत्ती, दिवे किंवा लाईटर जवळपास ठेवू नयेत, तसेच इलेक्ट्रिकल स्विच चालू किंवा बंद करू नयेत, कारण त्यामुळे स्पार्क होऊन स्फोट(cylinders) होण्याची शक्यता असते. जर वास कायम राहिला, तर रेग्युलेटर काढून सिलेंडरवर सेफ्टी कॅप लावावे आणि घरातील लहान मुलांना व वृद्धांना सुरक्षित स्थळी नेऊन बसवावे. वापरात नसलेल्या सिलेंडरला कोरड्या जागी ठेवणे गरजेचे आहे.
सिलेंडरला आग लागल्यास घाबरू नका; जाड ब्लँकेट भिजवून सिलेंडरभोवती गुंडाळल्यास आग नियंत्रणात येते. तत्पश्चात ताबडतोब 1906 या एलपीजी हेल्पलाइनवर कॉल करावा. या सर्व काळजीमुळे घरातील सुरक्षितता सुनिश्चित करता येते आणि अपघात टाळता येतो.

हेही वाचा :
मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळली, अल्पवयीन लायब्ररीत गेली आणि..
भारतासाठी धोक्याची घंटा! इथिओपियातील महाकाय ज्वालामुखीचा उद्रेक होणार
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उमेदवाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन