तब्बल 10 हजार वर्षांनंतर इथिओपियातीलहैली(Ethiopia) गुब्बी ज्वालामुखी पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी झालेल्या या अचानक उद्रेकानंतर मोठ्या प्रमाणावर राख आकाशात पसरली असून ती आता भारताच्या दिशेने सरकू लागल्याचे Toulouse VAAC ने पुष्टी केली आहे. ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक अंदाजे 10 ते 12 हजार वर्षांपूर्वी झाला होता, त्यामुळे हा स्फोट वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाचा मानला जात आहे.रविवारी सकाळी 8:30 UTC वाजता झालेल्या या भव्य स्फोटामुळे तयार झालेला राखेचा ढग रेड सी पार करत ओमान आणि यमनपर्यंत पोहोचला आहे. जरी ज्वालामुखी (Volcano)आता शांत झाल्याची माहिती मिळाली असली तरी हवेत आधीच पसरलेली राख वाऱ्याच्या दिशेनुसार हजारो किलोमीटरपर्यंत प्रवास करत आहे. त्यामुळे या प्रदेशातील विमानवाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा जारी करण्यात आला आहे.

या राखेमुळे भारतावर तात्काळ परिणाम होणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही, तरी भारतीय हवामान विभाग , ISRO आणि वातावरणीय संशोधन संस्था सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तज्ज्ञांच्या मते, ज्वालामुखीची(Volcano)राख जर उंच वातावरणीय स्तरांमध्ये गेली तर ती मोठ्या प्रमाणावर पसरू शकते आणि त्याचा प्रभाव हवेची गुणवत्ता, दृश्यता आणि सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेवर होऊ शकतो.विशेषत: दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या उत्तरेकडील राज्यांवर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात येत आहे कारण या प्रदेशातील वायू गुणवत्ता आधीच चिंताजनक आहे. जर राख भारतात पोहोचली तर AQI तात्पुरते आणखी खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या मध्य-पूर्वेत अनेक विमान कंपन्यांनी पर्यायी मार्गांचा विचार सुरू केला असून पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कारण ज्वालामुखीची(Ethiopia) राख इंजिनमध्ये गेल्यास विमानाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :
सोनम बाजवा अडचणीत! मशिदीत शूटिंग करणं पडलं महागात…
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उमेदवाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अजगरांच्या वस्तीत काकांची खतरनाक एंट्री, हसत हसत जाऊन झोपला अन्…Video Viral