शिवनाकवाडी (ता. इचलकरंजी) येथील सेवानिवृत्त जवान श्री राजेंद्र खोत यांचे चिरंजीव श्रेयश सुषमा राजेंद्र खोत यांनी मराठा रेजिमेंट सेंटर, बेळगाव येथे पहिल्याच प्रयत्नात भरती होऊन गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. लहानपणापासूनच देशसेवेची ओढ असलेल्या श्रेयशने कठोर परिश्रम, शिस्त आणि निश्चय या बळावर भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला. त्याच्या या यशामुळे कुटुंब, नातलग, गावकरी आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय लष्करात (army)प्रवेश मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते, पण ते प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असते. श्रेयशने हे स्वप्न पहिल्या प्रयत्नात पूर्ण करून तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. श्रेयशचे वडील सेवानिवृत्त जवान असल्यामुळे त्याला बालपणापासून लष्करातील शिस्त, देशभक्ती आणि सेवा भाव यांचे संस्कार मिळाले होते. त्यातूनच त्याच्यात लष्करात(army) जाण्याची जिद्द रुजली.

शिवनाकवाडी येथे आयोजित कार्यक्रमात श्रेयशचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्री प्रकाश खारगे, श्री दिगंबर मंचेकर, श्री जोतिबा बरगे यांच्या हस्ते श्रेयशचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी श्रेयशच्या कार्याची प्रशंसा करत त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, अशा तरुणांनी सैन्यात प्रवेश करून देशसेवेसाठी पहिले पाऊल टाकले आहे, हे गावासाठी आणि समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. श्रेयशसारखे तरुण आजच्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत असून अशा तरुणांकडून देशाच्या संरक्षणात आणि विकासात मोठे योगदान अपेक्षित आहे.

या यशासाठी श्रेयशने कुटुंबासह शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे विशेष आभार मानले. येणाऱ्या काळात देशासाठी सर्वोच्च योगदान देण्याची शपथ घेत, श्रेयशने आपल्या सैन्य कारकिर्दीची सुरुवात केली. शिवनाकवाडी गावाकडून देशाच्या सेवेकरिता सज्ज झालेल्या श्रेयश खोत या तरुणाला मनःपूर्वक शुभेच्छा!

हेही वाचा :

धर्मेंद्र यांची प्रॉपर्टी – पैसा मला…, हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य…
नागरिकांसाठी आनंदाची बातमी! RBI डिसेंबरमध्ये कर्ज दर कमी करण्याची शक्यता
21 लाख मोबाईल नंबरवर बंदी, तुमचा फोन लागतोय ना? कारण जाणून घ्या