इचलकरंजी : शहराला हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन(minor) मुलीवरील अत्याचार प्रकरणात गंभीर वळण आले असून, पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिक, हिंदुत्ववादी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबाने अत्याचारानंतर (minor)त्वरित पोलिसांकडे धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला असल्याचा आरोप परिजनांनी केला. या प्रक्रियेत आरोपीला संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, अशीही गंभीर शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रशासनावर प्रश्नचिन्हे

तक्रार नोंदवायला उशीर का झाला?

आरोपीला राजकीय किंवा अन्य पाठींबा आहे का?

तपासावर दबाव आणला जातो आहे का?

या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत.

नागरिकांचा जोरदार निषेध

नागरिक, महिला संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, आरोपीवर कठोर कारवाई, तपासाची पारदर्शकता आणि पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रागावलेल्या जनतेकडून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:

अत्याचाराला नाही — न्यायाला होकार!

आरोपीला संरक्षण देणाऱ्यांची सखोल चौकशी!

वेगवान न्यायालयात सुनावणी!

पोलिसांना जबाबदारी ठरवून कारवाई!

हेही वाचा :

थंडीत दररोज एक संत्री खाल्ल्यास काय होते?
ऐश्वर्या राय प्रथमच धर्म आणि जातीवर स्पष्टपणे बोलली, फक्त एका शब्दात म्हणाली…
सानिया मिर्झा हिचा घटस्फोटानंतर दुसऱ्या बाळाबद्दल अत्यंत मोठा खुलासा