सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर रोगांचा धोका वाढतो. आपल्या आहाराचा थेट परिणाम पचनसंस्थेवर आणि आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियावर होतो. आहारतज्ज्ञांच्या मते, काही फळे(fruits) आतड्यांसाठी विशेष फायदेशीर आहेत आणि नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

किवी: किवीमध्ये एक्टिनिडिन नावाचा एन्झाइम असतो, जो प्रथिने तुटवून पचनक्रिया सुधारतो. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि प्रीबायोटिक्स आतड्यांना मजबूत करतात आणि सूज व कोलन कर्करोगाचा धोका कमी करतात.
लिंबूवर्गीय फळे: संत्री, लिंबू आणि ग्रेपफ्रूट यांसारखी फळे नैसर्गिक डिटॉक्सिफायरसारखी काम करतात. यात व्हिटॅमिन सी व फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ दूर करून पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
सफरचंद: सफरचंदातील पेक्टिन फायबर बॅक्टेरियासाठी अत्यंत फायदेशीर असते. हे फायबर आतड्यांमध्ये तुटल्यावर ब्युटीरेट नावाचे फॅटी अॅसिड तयार होते, जे कर्करोगाच्या पेशींपासून बचाव करते. सालामध्ये असलेला क्वेरसेटिन हा शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे.
कलिंगड: कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते, जे शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि पचनक्रिया सुधारते. यातील लायकोपीन अँटिऑक्सिडंट कर्करोगापासून बचाव करते आणि कोलनसह इतर अनेक कर्करोगांचा धोका कमी करतो.
आरोग्यदायी फळांचा(fruits) नियमित आहारात समावेश केल्यास आतड्यांचे स्वास्थ्य सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराचे पचनसंत्रण सुरळीत राहते.

हेही वाचा :
मारूती कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी…
स्मृती मंधानाचं आलिशान घर तुम्ही पाहिलं का? फोटो आले समोर
“कौन राज ठाकरे? कौन अविनाश जाधव?”, रिक्षाचालकाचा दारूधुंद धुडगूस