देशात वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे(treatment) सर्वसामान्य रुग्णांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र सामान्य नागरिकांना आरोग्याच्या क्षेत्रात आर्थिक आधार देणाऱ्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (PM-JAY) मोठा बदल करण्यात आला असून, या योजनेत मिळणाऱ्या विमा कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी कुटुंबांना मिळणारा 5 लाखांचा विमा कव्हर आता 10 लाखांपर्यंत करण्यात आला आहे, ज्यामुळे लाखो लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

मोदी सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेचा उद्देश देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना गुणवत्तापूर्ण आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील(treatment) हजारो सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध आहे. कॅन्सर, हृदयरोग, अवयव प्रत्यारोपण, मोठ्या शस्त्रक्रिया यांसह अनेक गंभीर आजारांचा यात समावेश आहे.

सरकारने केलेल्या नव्या बदलानुसार, कुटुंबातील 70 वर्षांवरील सदस्यांना अतिरिक्त 5 लाखांचे कव्हर मिळणार आहे. म्हणजेच, जर कुटुंबात 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचा व्यक्ती असेल, तर त्या कुटुंबाला आधीचे 5 लाख + अतिरिक्त 5 लाख मिळून एकूण 10 लाखांचे आरोग्य विमा कव्हर मिळणार आहे.

या सुविधेसाठी संबंधित व्यक्तीने वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड सादर करणे आणि ई-केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. यामध्ये कमाल वयाची अट नसल्याने 80 वर्षांवरील व्यक्तींनाही पूर्ण लाभ मिळेल.या निर्णयामुळे मोठ्या उपचारांच्या खर्चाचा भार कमी होणार असून लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. आरोग्य सेवांमध्ये सरकारचा हा मोठा पाऊल सामान्य नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

हेही वाचा :

‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला
धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडली; घरी पोहोचली ॲम्ब्युलन्स
कोल्हापूर Airport वर तुफान राडा… अचानक शेकडो गावकऱ्यांनी…