कोल्हापूर विमानतळाबाहेर (Airport)मोठा राडा झाला आहे. येथील स्थानिकांनी अचानक विमानतळ परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर विमानतळाजवळ असलेल्या तामगाव ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी जमाव करुन गोळा करुन विमानतळाच्या दिशेने चालून गेले. या स्थानिकांना पोलिसांनी रोखलं असून विमानतळाबाहेर जोरदार घोषणाबाजी होत आहे.

कोल्हापूरच्या विमानतळाच्या पाठीमागील बाजूस तामगावला जाणारा रस्ता विमानतळ(Airport) प्राधिकरणाने अडवल्यामुळे तामगाव ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेल्या दीड वर्षापासून रस्ता बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्ता बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. आंदोलकांना पोलिसांनी बॅरिकेट्स घालून आडवलं आहे. मात्र आंदोलकांनी आता आमची सहनशक्ती संपली असून जिल्हा प्रशासनाची मनमानी आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये त्यांना आडवण्यात आल्यानंतर बाचाबाचीही झाल्याची माहिती समोर येत आहे. आंदोलकांनी आता या प्रकरणाचा एकदा काय तो निकाल लागलाच पाहिजे अशी मागणी करत विमानतळ परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.छोट्या मोठ्या कमांसाठीही हा रस्ता वापरता येत नसल्यावर स्थानिक गावकऱ्यांचा आरोप आहे. अगदी वळसा घालून शाळेत सोडायला जाण्यापासून ते दैनंदिन कामांसाठी मोठा फेरफटका मारावा लागतो असं स्थानिकांनी म्हटलं आहे. आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता वापरायला मिळाला पाहिजे असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत विमानतळ प्रशासनाचा निषेध नोंदवला.

‘आता नाहीतर कधीच नाही… न्याय घ्या… न्याय घ्या… आमच्या गावचा रस्ता घ्या’, ‘जिल्हा प्रशासनाच्या ममानी कारभाराचा धिक्का असो’ असे फलक आंदोलक गावकऱ्यांनी हातात पकडल्याचंही दिसून आलं. स्थानिक प्रशासनाकडून आंदोलन सुरु झाल्यानंतर पहिल्या तासाभरात कोणतीही प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नाही. जोपर्यंत पर्यायी मार्ग मिळत नाही किंवा जुना रस्ता उघडला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता.

पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थित करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घडवून आणतो असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलक मागे फिरले आहेत. आता ही बैठक नेमकी कधी आणि कशी घडवून आणणार याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तरीही या आंदोलनामुळे तामगाव ग्रामस्थांना भेडसावत असलेल्या कनेक्टीव्हिटीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मागील दीड वर्षांपासून हा रस्ता पुन्हा सुरु करण्यात यावा अशी स्थानिकांची मागणी आहे. मात्र या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांनी थेट आंदोलनाचं हत्यार उपसल्याचं दिसून आलं.

हेही वाचा :

आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा आजचे 22 कॅरेटचे भाव
‘बिनविरोध निवडणूक घोटाळा!’ ठाकरे सेनेचा हल्लाबोल
कामगार आश्वासक कायदे श्रम प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न