महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका (election)सुरू असताना राज्यात बिनविरोध निवडून येण्याची अभूतपूर्व लाट निर्माण झाली आहे. मात्र ही लाट नैसर्गिक नसून सत्तेचा दुरुपयोग आणि दबावाची परिणती आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी केला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरे गटाने थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.अग्रलेखात म्हटलं आहे की, “भाजप आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करत आहे. विरोधकांना धमक्या देऊन किंवा दडपशाही करून माघार घ्यायला भाग पाडले जात आहे.”
शिवसेनेनं काही उदाहरणे पुढे करत भाजपवर नातलगांना पदे मिळवून देण्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती चिखलदरा नगरपालिकेत बिनविरोध निवडून, मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन जामनेर नगराध्यक्षपदी ,मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या मातोश्रींना दोंडाईचा नगराध्यक्षपदी
बिनविरोध निवडून आणल्याचा उल्लेख करण्यात (election)आला आहे.अग्रलेखात असा दावा करण्यात आला आहे की, अनेक ठिकाणी विरोधी उमेदवारांचे अर्ज रहस्यमयरीत्या बाद करण्यात आले आहेत तर काहींना थेट माघार घेण्यास भाग पाडण्यात आले आहे.ठाकरे गटाने पुढे असा आरोप केला आहे की, “भाजपने निवडणूक प्रक्रियेचे व्यापारीकरण केले असून पैसा, सत्ता आणि प्रशासनाचा वापर करून लोकशाहीची गळचेपी केली जात आहे.”

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा उल्लेख करत शिवसेनेनं म्हटलं की, “निवडणुकीत पैशाची चिंता करू नका, सरकार आहे ते बघेल” अशी भूमिका स्वतः मंत्री घेत असतील तर निवडणूक आयोग मूकदर्शक का आहे, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.अग्रलेखाच्या शेवटी म्हटलं आहे की, “लोकशाहीचे हे निर्लज्जपणे होत असलेले अवमूल्यन महाराष्ट्राला शोभणारे नाही. निवडणुकांपूर्वीच निकाल ठरवला जात असेल, विरोधाला जागा नसेल तर संविधान आणि लोकशाही या दोन्हींची अर्थवाहीता नाहीशी होते.”राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू असताना या आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

15 फेब्रुवारी 2026 पर्यंत…; फडणवीसांना आलेल्या पत्राने खळबळ
27 वर्षीय गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक, ट्राय सिरीज मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला
शोधण्याचा प्रयत्न कराल तर “भोंदू बाबा”अनेक सापडतील