कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
हे आपल्याच बाबतीत असे का घडते? आजारपण हटत का नाही? नोकरी का लागत नाही? स्थळ सांगून का येत नाही? अपयश हात धुऊन पाठीमागे का लागते आहे? आपल्याच घरात नकारात्मकता का? चांगले काहीच काय घडत नाही?अशा अनेकप्रश्नांचा गुंता सोडवण्यासाठी सतसदविवेक बुद्धीचा वापर केला नाही तर पाऊले आपोआप अंधश्रद्धेकडे वळू लागतात.आणि मग कुणी भोंदू बाबाचा (Bhondu Baba)तर कोणी चुटकीवाल्या बाबाचा शोध घ्यायला सुरुवात करतो, आणि त्यांना ते भेटतात. अंधश्रद्धेच्या वाटेवरून चालणारे सगळेच लोक अशिक्षित असतात असे नाही तर उच्च शिक्षित सुद्धाअंधश्रद्धेच्या आहारी जातात.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचीपुण्यामध्ये ते मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अज्ञात गुन्हेगारांचा शोध पुणे पोलिसांकडून युद्ध पातळीवरून सुरू होता.दाभोळकरांचे मारेकरी सापडत नव्हते.

तेव्हा पुण्यात कार्यरत असलेल्या तेव्हाच्या एका आयपीएस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात चक्क प्लांचेटचा प्रयोग केला होता. प्लॅचेटच्या माध्यमातून गुन्हेगार शोधण्याचा या अधिकाऱ्याचा हा प्रयत्न मीडियाने समोर आणल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. म्हणजे ज्यांनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध लोक चळवळ उभा केली होती त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी अंधश्रद्धेचाच(Bhondu Baba) मार्ग निवडण्यात आला होता.सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही अपयश येत असेल तर बुद्धिजीवी लोक सुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी कसे जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील तेव्हाच्या त्या आयपीएस अधिकाऱ्याचे देता येईल.गेल्या काही महिन्यांपासूनकोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील काही भागातअंधश्रद्धेचे प्रकार दिसू लागले आहेत. स्मशानातले अघोरी प्रकार उघडकीस आले आहेत.
झाडाला काळी बाहुली खिळ्याने ठोकण्याचे प्रकार पुढे आले आहेत. हळद आणि कुंकू लावलेली भाकरी, पांढरा भात, सुया टोचलेले लिंबू, काळी बाहुली या सर्व वस्तू एका टोपलीमध्ये ठेवून ही टोपली तिकटीवर, नदीच्या काठी, ओढ्यावर, पुलावर, स्मशानभूमी जवळठेवली जाते. या टोपलीमध्ये एका कागदावर कुणाची तरी नावेही लिहून ठेवलेली असतात. हा सारा प्रकार “करणी धरणी”चा एक भाग समजला जातो. हे असे करायला कुणी तरी भोंदूबाबाने ने सांगितलेले असते. भानामतीचा प्रकार आणखी काही वेगळा असतो.म्हणजे घरातील कपड्याने अचानक पेट घेणे, अशाच काही अकल्पित घटना घडणे याला भानामती असे म्हणतात. पण हा अंधश्रद्धेतीलच एक आघोरी प्रकार असतो.मनामध्ये नकारात्मक प्रश्नांची गर्दी झालेली असते.त्याची उत्तरे मिळत नाहीत.मग अशी उत्तरे शोधण्यासाठी अंधश्रद्धा हा एकमेव पर्याय असतो.
मग कोणी तांत्रिक मांत्रिक बाबाकडे जातो, तर कोणी अघोरी विद्या करणाऱ्याकडे जातो, त्यात कुणी चुटकी वाला बाबा असतो तर कोणी महिलांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणारा असतो. असे बाबा प्रत्येक शहरात, प्रत्येक खेड्यात, गावात असतो. त्यांची बैठक दर्गा, दत्त मंदिर परिसरात असते. किंवा त्यांचा दरबार ही असतो. या भोंदू बाबांची महती सगळीकडे पोहोचवणारे एजंट असतात.पोलिसांनी अगदी मनापासून ठरवले तर ही मंडळी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत.अंधश्रद्धेच्या माध्यमातून काही अघोरी कर्म करत असताना एखाद्या महिलेचा जीव गेला किंवा तिचे लैंगिक शोषण झाले आणि त्या महिलेने तक्रार केली तरच पोलीस जागे होतात. मग गुन्हा दाखल होतो, भोंदू बाबाला अटक केली जाते. पण हे असे होऊच नये असे वातावरण तयार केले जात नाही.काही वर्षांपूर्वी एका बाबांचा असाच आठवड्यातून काही दिवस दरबार भरायचा.या दरबारात सुशिक्षित मंडळी सुद्धा हजेरी लावायचे.
ज्यांच्यावर करणी झालेली आहे, त्या व्यक्तीच्या डोक्यातून हे बाबा खिळे बाहेर काढायचे. महिला असेल तर तिच्या छातीला तोंड लावून छातीतून खिळे बाहेर काढायचे. कसबा बावडा परिसरातही स्वतःला सरकार म्हणणाऱ्या व्यक्तीचा दरबार भरायचा. कोल्हापूर शहरात असेच एक महाराज होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांच्याकडून भविष्य जाणून घेण्यासाठी टोकन घ्यावे लागत असे. या महाराजांच्या नादी लागलेले काही लोकप्रतिनिधी सुद्धा होते. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी यांनी पोलीस ठाण्यामध्ये प्लांचेट चा प्रयोग केला तेव्हाचे आयपीएस अधिकारी हे सध्या कोल्हापूरच्या ग्रामीण भागात सेवानिवृत्तीचे जीवन जगताहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर तेव्हा टीकेची झोड उठवण्यात आली होती. अतिउच्च शिक्षित व्यक्ती अंधश्रद्धा जागवत असतील तर मग सामान्य अशिक्षित आणि सुशिक्षित लोकांनी काय करायचे?

हेही वाचा :
मला विसरू नका, माफ करा; प्रसिद्ध अभिनेत्याची धक्कादायक पोस्ट
T20 वर्ल्ड कप 2026चे ग्रुप जाहीर; ‘या’ दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होण्याची शक्यता!
इचलकरंजीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन प्रकरण गाजतंय; शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा, आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल