बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले अनुभवी अभिनेता (actor)रोनित रॉय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आगामी प्रोजेक्ट्सपेक्षा त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना विचारात पाडलं आहे. रोनितने अचानकपणे सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली असून, त्याची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये रोनितने चाहत्यांची माफी मागत, “मला विसरू नका… पण मला काही काळ दूर जावं लागणार आहे,” असे भावनिक शब्द लिहिले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या मानसिक स्थितीबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नोटमध्ये रोनितने(actor) सांगितले की, तो आयुष्यात अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी नवीन मार्ग शोधणे आवश्यक झाले आहे. या निर्णयामागे वैयक्तिक जीवनाला प्राधान्य देण्याची कारणे असल्याचेही त्याने नमूद केले.
त्याने पुढे लिहिलं की,
“मी तुमचं प्रेम, सन्मान आणि साथ कधीही विसरणार नाही. पण आता मला माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी स्वतःला पुन्हा शोधण्याची वेळ आली आहे. हा मार्ग अनोळखी आहे, पण त्यावर चालणं मला गरजेचं आहे.”
रोनित रॉयचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी भावनिक ठरला असून, अनेकांनी त्याला कमबॅकची वाट पाहण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, त्याचा हा सोशल मीडिया ब्रेक किती काळासाठी असेल याबाबत मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. However, चाहत्यांना एकच आशा — रोनित पुन्हा परत येईल आणि आणखी दमदार भूमिकांसह नजरेसमोर उभा राहील.

हेही वाचा :
T20 वर्ल्ड कप 2026चे ग्रुप जाहीर; ‘या’ दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होण्याची शक्यता!
इचलकरंजीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन प्रकरण गाजतंय; शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा, आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल
अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी