दिल्ली क्राइम सीझन 3 मुळे अभिनेत्री (Actress)शेफाली शाह पुन्हा एकदा चर्चेत आहे. मागील काही वर्षांमध्ये शेफाली शाह एक उत्तम अभिनेत्री म्हणून उदयास आली आहे. मात्र यासाठी तिला फार संघर्ष करावा लागला आहे.करिअरच्या सुरुवातीच्या काळात घेतलेल्या निर्णयांचा विचार करताना शेफाली शाहला आज हसू येतं. आपल्या एका निर्णयाचा शेफाली शाहला आजही पश्चाताप होत आहे. तो म्हणजे अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणं.

वयाच्या 28 व्या वर्षी शेफाली शाहने(Actress) ‘वक्त’ चित्रपटात तिच्यापेक्षा वयाने 5 वर्ष मोठे असणाऱ्या अक्षय कुमारच्या आईची भूमिका निभावली होती. हा अनुभव आपल्यासोबत अनेक वर्ष राहिल्याचं ती सांगते.”मी माझे चित्रपट फार पाहत नाही. कदाचित मी एकदा कधीतरी पाहिला असाला. पण आज जर मी पुन्हा एकदा वक्त चित्रपट पाहिला तर मी लाजेनेच मरुन जाईन,” असं तिने सांगितलं आहे. “माझ्याकडे तेव्हा तितकं शहाणपण किंवा आज चित्रपटांबद्दल आहे तितकं ज्ञान तेव्हा नव्हतं”, अशी कबुली तिने दिली आहे.
“दिल्ली क्राइम” सीरिजमध्ये काम केल्यानंतर माझी काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली, असं तिने सांगितलं आहे. “दिल्ली क्राइम चित्रपटात काम केल्यानंतर माझ्या कामाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. हा माझ्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पाच नव्हता तर माझ्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला”, असं तिने सांगितंल आहे.
वक्त चित्रपटानंतर, शेफालीने पुन्हा कधीही तिच्यापेक्षा मोठ्या किंवा काही वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तीच्या आईची भूमिका करायची नाही असा निर्णय घेतला होता. काही वर्षांनंतर, झोया अख्तरने तिला ‘दिल धडकने दो’ चित्रपटात आईच्या भूमिकेची ऑफर दिली. शेफालीने नकार देण्याचं ठरवलं होतं.”जेव्हा झोया मला भेटली तेव्हा ती म्हणाली, ‘मला माहित आहे की तू नाही म्हणशील, पण मला प्रयत्न करायचा आहे’,” असं शेफालीने सांगितलं. पण एका सीननंतर शेफालीचा निर्णय बददला “मी ती एक ओळ वाचली: ती तिच्या तोंडात केक भरते. आणि मी म्हणाले, मला हे करायचं आहे,” अशी आठवण तिने सांगितली.

हेही वाचा :
अपचनाची समस्या आहे? मग दररोजच्या जीवनशैलीमध्ये करा फक्त हा बदल…
खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?
सोनाक्षी सिन्हा हिचे प्रेग्नंसीबद्दल अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाली, हा मी प्रेग्नंट..