सध्या जग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असून यामध्ये एआय टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. एआय द्वारे अनेक तंत्रज्ञान(machine) विकसित केले जात आहे. पण याच एआयवरुन डिपफेकच्या मदतीने अनेक वेगवेगळे व्हिडिओ देखील बनवले जात आहे. ज्यातून एक अभासी जग तयार केले जात आहे. जे पाहून लोक थक्क होतील.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दुबईमधील असल्याचे सांगतिले जात आहे. दुबईने एक एआय बार्बर पॉड ३.० ही हेअरकट मशिन बनवली असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. लोकांमध्ये चर्चा सुरु आहे की, जसे एखाद्या एटीएममधून जसे आपण कार्ड टाकल्यावर पैसे बाहेर येतात, अगदी तसेच हे केस कापण्याचे मशीन आहे. यासाठी ना नाव्ही, ना कात्री, ना हेअरस्टाईलिस्टची गरज आहे. ना ही तुम्हाला तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहावी लागणार आहे, ना नाव्ही आणि तुमच्यात गोंधळ उडणार आहे.

तुम्हाला फक्त या मशीनच्या(machine) गोलाकार दिसणाऱ्या भागात डोकं ठेवायचे आहे आणि तुमचे केस कट होऊन डॅशिंग अशा हेअरस्टाईल तयार. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण या मशिनमध्ये डोकं टाकतो. यानंतर मशिनच्या भागात लाईट बंद-चालू होते. आणि काही वेळातच तरुणाचे कुरळे केस कट होऊन मशिनमध्ये खालच्या भागात पडतात. तुम्ही पाहू शकता की तरुणाने डोकं बाहेर काढल्यावर त्याची एक मस्त, डॅशिंग अशी हेअरस्टाईल तयार झालेली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DAMIADENUGA या अकाऊंटवर शेअर करण्याात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. पण लोकांना या व्हिडिओवर अनेकांनी एआय जनरेटेड असल्याचे लोकांचे म्हटले आहे. अनेकांनी हे तंत्रज्ञान अद्याप तयार झालेले नसल्याचे म्हटले आहे.

सध्या हा व्हिडिओ नेमका कुठून व्हायरल होऊ लागला आहे, याची माहिती मिळालेली नाही. पण इन्स्ट्राग्राम, एक्स यांसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सध्या आपण ऑटोमोशनच्या दिशेने जात आहोत. पण प्रश्न पडला आाहे की, खरचं असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे का? या व्हिडिओवर विश्वास ठेवायचा का नाही?

हेही वाचा :

केवळ 411 रुपये…सुकन्या योजनेत कसे मिळतील 72 लाख
नागरिकांनो पॅन कार्ड बाबत ‘ही’ चूक केल्यास होऊ शकतो हजारोंचा दंड
हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट? लग्नाअगोदरच देणार क्रिकेटरच्या पहिल्या बाळाला जन्म..