बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा त्यांच्या आरोग्याबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी उपचार सुरू असून रविवारी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड(condition) झाल्याने डॉक्टरांची टीम तातडीने बोलावण्यात आली.

घराबाहेर मीडियाची गर्दी वाढू नये म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. देओल कुटुंबातील सदस्यही सतत संपर्कात (condition)आहेत. धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलदेखील तातडीने घरी पोहोचल्याचे दिसून आले.

दरम्यान, धर्मेंद्र यांचे चुलत भाऊ आणि चित्रपट निर्माते गुड्डू धनोआ यांनी नुकतीच भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, “त्यांची तब्येत हळूहळू सुधारते आहे. त्याबाबत अधिक काही सांगणे योग्य नाही, पण ते वैद्यकीय देखरेखीखाली सुरक्षित आहेत.”धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत निवेदन देओल परिवाराकडून देण्यात आलेले नसले तरी चाहत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर Airport वर तुफान राडा… अचानक शेकडो गावकऱ्यांनी…
आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा आजचे 22 कॅरेटचे भाव
‘बिनविरोध निवडणूक घोटाळा!’ ठाकरे सेनेचा हल्लाबोल