ठाणे शहरात रविवारी रात्री धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पोखरण रोड नं. २, गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने (rickshaw)दारूच्या नशेत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवयांच्यावर अश्लिल आणि अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ठाण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गाडी लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला. उत्तर प्रदेशमधून आलेल्या एका रिक्षाचालकाने “कौन राज ठाकरे? कौन अविनाश जाधव?” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. एवढ्यावरच न थांबता “ये ठाणे का गांधीनगर है, यहां भैय्या का राज चलता है…” असे म्हणत मराठी समाजाविरोधात उत्तेजक वक्तव्य करण्यात आले.

या वक्तव्यांमुळे परिसरातील वातावरण एकाच क्षणात तणावग्रस्त झाले. स्थानिक तरुण आणि मनसे कार्यकर्त्यांनी त्या रिक्षाचालकाला (rickshaw)पकडून पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतरही मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच त्या आरोपीला चोप दिल्याची माहिती समोर आली आहे.स्वतः मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकारांना सांगितलं की, “जो कोणी राज ठाकरे यांच्या विरोधात बोलायची हिंमत करेल, तो कुठेही असेल तरी त्याला सोडलं जाणार नाही.” त्यांनी पुढे स्पष्ट इशारा दिला की, महाराष्ट्रात येऊन मराठी समाजाचा अपमान कोणी सहन केला जाणार नाही.
या घटनेनंतर दिलेल्या वक्तव्यात अविनाश जाधव यांनी भाजपावर थेट आरोप केला. त्यांनी म्हटलं की, “भाजपला महाराष्ट्रात मराठी-उत्तर भारतीय असा वाद हवा आहे. त्यातून सहानुभूती मिळवून मतं खेचण्याचा त्यांचा डाव आहे.” या प्रकारामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत.जाधव पुढे म्हणाले, “आम्ही कुणाला त्रास देत नाही. पण जर कोणी मराठी माणसाला, राज ठाकरेंना किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमी लेखलं तर त्याचा कार्यक्रम फिक्स आहे.”तसेच आता या घटनेचा तपास सुरू असून आरोपीच्या भूमिकेबाबत पुढील चौकशी केली जात आहे. मात्र ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण असलं तरी पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा :
अमित ठाकरे अन् पार्थ पवारांची तुलना! राज ठाकरेंच्या पक्षाचा टोला; ‘1800 कोटींच्या…
कोल्हापूर मधील गगनबावड्यात बिबट्याची दहशत; वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी, ग्रामस्थांची मागणी
तब्बल 18 दिवस बँका बंद…! बँकेत जाण्यापूर्वी वाचा महत्त्वाची अपडेट