रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Bank)अर्थात RBI ने सुट्ट्यांचा मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये देशभरातील कोणत्या ठिकाणी बँका बंद राहतील आणि कोणत्या दिवशी सुरू असतील यासंबधित सर्व माहिती ते याद्वारे प्रसिद्ध करतात. डिसेंबर बँक हॉलिडे धमाका असणार आहे. कारण, डिसेंबरमध्ये तब्बल 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. बघता बघता नोव्हेंबर संपत आला असून 2025 या वर्षाचा डिसेंबर शेवटचा महिना सुरू होणार आहे. जर पुढच्या महिन्यात तुमचं बँकेकडे काही काम असेल किंवा बँकेला भेट देणार असाल तर डिसेंबर महिन्यातील सुट्ट्याची यादी नक्की वाचा. ज्यामुळे तुमची धावपळ होणार नाही. बँकेला भेटीचे नियोजन करण्यापूर्वी ही यादी नक्की तपासा. कारण या महिन्यात तब्बल 18 दिवस बँका बंद राहणार आहेत.

डिसेंबर महिन्यात एकूण 12 दिवस बँका (Bank)बंद राहणार असून यामध्ये रविवार, शनिवार आणि काही सणांच्या सुट्ट्यांचा समावेश केल्याने तब्बल 18 दिवस बँका बँक राहणार आहे.

1 डिसेंबर : अरुणाचल प्रदेशात स्वदेशी श्रद्धा दिनानिमित्त बँक बंद
3 डिसेंबर : गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर्स डेनिमित्त बँक बंद
12 डिसेंबर : पा तोगन नेंगमिंजा संगमा दिनानिमित्त मेघालयात बँक बंद
18 डिसेंबर : गुरु घासीदास जयंतीनिमित्त आणि मेघालयात यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँक बंद
19 डिसेंबर : मुक्ती दिनानिमित्त गोव्यात बँक बंद
24 डिसेंबर : नाताळाच्या एक दिवसपूर्वी मेघालय आणि मिझोरममध्ये बँक बंद
25 डिसेंबर : नाताळाच्या निमित्ताने देशातील बहुतेक राज्यांमध्ये बँक बंद
26 डिसेंबर : नाताळाच्या उत्सवामुळे मेघालय, मिझोरम आणि तेलंगणामध्ये बँक बंद
27 डिसेंबर : शहीद उधम सिंह जयंतीनिमित्त हरियाणामध्येही बँक बंद
27 डिसेंबर : गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात बँक बंद
30 डिसेंबर : यू क्यांग नांगबाह दिनानिमित्त आणि सिक्कीममध्ये तमु लोसारनिमित्त बँक बंद
31 डिसेंबर : मिझोरम आणि मणिपूरमध्ये नवीन वर्षाच्या दिवशी बँक बंद

हेही वाचा :

मूल नसल्याने जोडपे डॉक्टरकडे गेले, नंतर कळालं पत्नी स्त्री नसून पुरुष
आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, या आहेत अटी
इथे भय्यांची चालणार, राज ठाकरेंच नाव घेऊन शिवीगाळ