ठाण्यातील गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षा चालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात शिवीगाळ करत उद्धट वर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर ठाणे चितळसर पोलिसांनी संबंधित रिक्षा(rickshaw) चालकाला अटक केली आहे.ही घटना किरकोळ वादातून घडली असल्याची माहिती मिळत असून, व्हिडिओमध्ये तो चालक, “हे मुंबई नाही, गांधी नगर आहे… इथे राज ठाकरे नाही, भय्या चालणार!” असे उर्मटपणे म्हणताना दिसतो. या वक्तव्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

या घटनेवर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी प्रतिक्रिया देत मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “देशाला चांगलं माहिती आहे की भाषावाद आणि प्रांतवाद कोण भडकवतंय. स्वतःची मुलं इंग्रजी-जर्मन शिकणार, जावेद अख्तर हिंदीत बोलले की टाळ्या वाजवणार आणि बाहेर हिंदीवर विरोध करणार — इतका दुटप्पीपणा दुसरा नाही.”

दरम्यान, मनसेने या घटनेवर कठोर भूमिका घेतली आहे. ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चेतावणी देत सांगितले,“ठाणे मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. आम्ही (rickshaw)निवडून आलो म्हणजे हा बालेकिल्ला नाही— आमच्या हजारो मुलांच्या शपथेवर सांगतो, मराठीचा अपमान सहन होणार नाही.”ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा राज ठाकरे यांनी नुकतेच परळ येथे झालेल्या मालवणी जत्रोत्सवात मराठी जनतेला सतर्क राहण्याचा संदेश दिला होता. त्यांनी मोठ्या आवाजात चेतावणी दिली होती,“रात्र वैऱ्याची आहे… ही कदाचित शेवटची महापालिका निवडणूक असेल. गाफील राहू नका.”मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुका येत्या जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असल्याने या घटनेमुळे राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा :

‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला
धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडली; घरी पोहोचली ॲम्ब्युलन्स
कोल्हापूर Airport वर तुफान राडा… अचानक शेकडो गावकऱ्यांनी…