गेल्या काही काळात स्टंटचे(stunt) प्रमाण अधिक वाढले आहेत. लोक काही सेकंदाच्या रिलसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी आपला आणि आसपासच्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे अनेकांचे अपघात घडले आहेत. पण लोकांच्या अंगातील हिरोगिरी बाहेर पडण्याचे नाव घेईना. सध्या असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तरुणांना गाडीच्या छतावर उभे राहून स्टंट करणं भोवलं आहे. त्यांच्या असा अपघात झाला आहे की, आयुष्यात पुन्हा कधीच स्टंट करण्याचा विचारही डोक्यात आणणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका कार रस्त्यावरुन वेगाने चालली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरु आहे. या कारच्या छतावर काही तरुण बसलेले आहे. हे तरुण अचानक गाडीवर उभे राहून डान्स करायला जातात. पण याच वेळी दुसऱ्या बाजूने एक टेम्पो येते असतो. टेम्पो अचानक गाडीच्या समोर आल्याने कार चालक ब्रेक मारतो. यामुळे कारच्या छतावर असलेले तरुण हवेत उडतात आणि थेट टेम्पोच्या चाकाखाली येतात. सुदैवाने टेम्पो चालक देखील तातडीने ब्रेक मारतो. यामुळे त्यांचा जीव वाचतो. जर टेम्पो चालकाने वेळेत ब्रेक मारला नसता तर तरुणांच्या अंगावर गाडी गेली असते. सध्या या भयावह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @PRMundru या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, स्वत: तर जाणार, पण दुसऱ्यालाही सोबत घेऊन जाणार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने लोक केवळ एका रिलसाठी (stunt)आपला जीव धोक्यात घालत आहेत..? असा प्रश्न केला आहे. तर काही लोकांनी अशा लोकांमुळेच अपघात जास्त घडतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर येथील कागलमध्ये महायुतीत गोंधळ, निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी
इतना डरना जरुरी है…!
..तर माझा मृत्यू होईल,’ अक्षय कुमारचं नाव घेत शेफाली शाहने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव