भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू (Cricketer)स्मृती मानधना हिचे 23 नोव्हेंबर रोजी होणारे लग्न अचानक पुढे ढकलल्यानंतर नवे वादळ उभे राहिले आहे. सांगलीत मोठ्या उत्साहात करण्यात आलेल्या तयारीनंतर, लग्नाच्या काही तास अगोदरच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे कुटुंबियांच्या निर्णयानुसार लग्न तात्पुरते स्थगित करण्यात आले. त्यानंतर स्मृतीने आपल्या इन्स्टाग्रामवरील लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट हटवल्या.

लग्न पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलचे कथित स्क्रीनशॉट व्हायरल झाले. या स्क्रीनशॉटमध्ये पलाश एका मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीशी चॅट करत असल्याचा दावा केला जात आहे. काही संदेशांमध्ये पलाश तिला भेटण्याचे आमंत्रण देत असल्याचे दिसते, असा दावा केला जातोय.
या स्क्रीनशॉट्सची सत्यता अद्याप अस्पष्ट असून, पलाश मुच्छलकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. स्मृतीकडूनही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.याच व्हायरल स्क्रीनशॉटचा आधार घेत बॉलिवूडचे वादग्रस्त समीक्षक आणि अभिनेता म्हणून ओळखला जाणारा केआरके (कमाल आर खान) पुन्हा चर्चेत आला आहे.त्याने केलेला दावा मात्र अधिक धक्कादायक आहे.
KRK चा दावा:
“लग्नाचा सोहळा सुरू असताना स्मृतीने पलाशला एका कोरिओग्राफरसोबत रंगेहाथ पकडले.”
“पलाशला स्मृतीशी लग्न करायचे होते ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी.”
हे दावे केआरकेने सोशल मीडियावर केले असले तरी त्यांची पडताळणी झालेली नाही.
स्मृती मानधना (Cricketer)सध्या आपल्या वडिलांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रित करत आहे.पलाश आणि स्मृतीच्या लग्नाची पुढील तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.दोन्ही कुटुंबीय शांत वातावरणात निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.भारतीय क्रीडा क्षेत्रातील एका प्रतिष्ठित चेहऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात अचानक निर्माण झालेल्या या गोंधळामुळे चाहत्यांमध्ये चिंता आणि कुतूहल दोन्ही वाढले आहे.स्क्रीनशॉट्स, आरोप आणि केआरकेचे दावे — या सर्वांचा खरा अर्थ काय हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :
OpenAI ने ChatGPT मध्ये लॉन्च केलं AI Shopping Tool, जाणून घ्या
“लाडकी बहीण योजना बंद….”, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितल…
डी के ए एस सी महाविद्यालयामध्ये एन सी सी डे उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न