श्री कौस्तुभ गावडे यांच्या संकल्पनेतून एनसीसी विभागाकडून ‘बालोद्यान’ अनाथ आश्रमातील मुलांना मदतीचा एक हात

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण(Education) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कौस्तुभ गावडे यांच्या संकल्पनेतून एन. सी. सी. डे निमित्त डी के ए एस सी महाविद्यालयातील एनसीसी विभागाने ‘बालोद्यान’ अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक व इतर साहित्य वाटप, श्रमदान व स्नेहभोजन असे उपक्रम यशस्वीरित्या संपन्न केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे हे होते.

महाविद्यालयातील एन. सी. सी. कॅडेटनी सामाजिक उपक्रमासाठी शहरातून मदत पेटीच्या माध्यमातून निधी गोळा केला. सदर मदत निधीतून ‘बालोद्यान’ या अनाथ आश्रमातील मुलांच्यासाठी 66 स्वेटर, दोन वॉटर हीटर, १०० किलो साखर व 10 डझन वह्या असे शैक्षणिक व इतर साहित्य मदत स्वरूपात दिले आणि आश्रमातील मुलांना स्नेहभोजनाचे नियोजन केले. त्याचप्रमाणे एनसीसी कॅडेटनी बालोद्यान परिसरात श्रमदान केले.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे म्हणाले, “आमच्या एन सी सी विभागाने आम्हाला व महाविद्यालयाला अभिमान वाटावा अशी गोष्ट केली. महाविद्यालयीन(Education) जीवनात समाजसेवेचे भान जपत या मदतीतून आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी आमच्या विद्यार्थ्यांना, आम्हाला याचा आनंद आहे.” महाविद्यालयाचे एनसीसी विभागप्रमुख प्रा. लेफ्ट. विनायक भोई यांनी, “असा उपक्रम एनसीसी विभागाकडून घेता आला व गरजू विद्यार्थ्यांना मदत करता आली याबद्दल आनंद असून असे उपक्रम सातत्याने घेत राहू.” अशा भावना व्यक्त केल्या.

याच बरोबरच एन सी सी विभागाने संस्थेचे सी ई ओ कौस्तुभ गावडे यांच्याच संकल्पनेतून मागील महिन्यात पूरग्रस्त निधी जमा करून सोलापूर येथील महाविद्यालयास मदत केली. संस्थेचे सी. ई. ओ. मा. श्री. कौस्तुभ गावडे यांनी हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल महाविद्यालयाचे वयसेस विभागाचे कौतुक केले. प्रा. रोहित शिंगे, प्रा. प्रथमेश गवळी, श्री संजय खुळ व सर्व एनसीसी कॅडेट उपस्थित होते.

हेही वाचा :

‘उद्धव ठाकरेंसोबत आघाडी करायची असल्यानं…’, ‘यू-टर्न घेणारे राज…
पलाशचे फ्लर्टिंगचे मेसेजेस व्हायरल! मेरी डिकोस्टाने केला मोठा गौप्यस्फोट
कधी बहीण, कधी बायको, सलग 5 वर्षे अत्याचार अन् एक नकार…