कल्याण – कल्याण-शीळ रस्त्यालगत देसाई खाडी परिसरात एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. शिळ डायघर पोलिसांनी या खळबळजनक घटनेचा अवघ्या २४ तासांत तपास करत आरोपीला गजाआड केले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुणीचे (rejection)वय अंदाजे 28 ते 30 वर्षे होते आणि ती चार महिन्यांची गर्भवती होती. मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिळ डायघर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ आणि पीआय राजपूत यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास सुरू केला. फुटेजमध्ये आरोपी श्रीनिवास विश्वकर्मा बॅग टाकताना दिसला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून ताब्यात घेतले.पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणी ५ वर्षांपूर्वी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागून उदरनिर्वाह करत होती. आरोपी श्रीनिवास विश्वकर्माने तिला आपल्या घरी घेतले आणि गेल्या ५ वर्षांत तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला. आरोपीने तिला विविधवेळी आपली बहीण, मुलगी किंवा बायको म्हणून ओळख करून दिली.

गर्भधारणेच्या नाजूक अवस्थेतही आरोपीने तिच्यावर जबरदस्ती(rejection) केली. शुक्रवारी, तरुणीने शारीरिक संबंधासाठी नकार दिला, त्यावरून आरोपीने तिचा गळा आवळून हत्या केली. मृतदेह लपवण्यासाठी त्याने ती सुटकेसमध्ये ठेवली आणि दोन दिवस घरात लपवून ठेवल्यानंतर रविवार रात्री देसाई खाडीमध्ये फेकली.या प्रकरणी आरोपीवर खुन (IPC कलम 302) आणि लैंगिक अत्याचार (IPC कलम 376) यासह इतर संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शिळ डायघर पोलीस यांनी वेगवान तपास आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला गजाआड करून प्रकरणाची उकल केली आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं… शिंदेंच्या मंत्र्याच्या विधानाची राज्यभरात चर्चा!
आता बनवता येणार नाही Fake आधार कार्ड आणि पॅन कार्ड…
शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्….