टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल हा मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाच्या(sports news) बाहेर असला तरी अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत येत असतो. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्व पत्नी आणि कोरिग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी त्याचा घटस्फोट झाला होता. लग्नाच्या काही वर्षातच दोघे वेगळे झाले. त्यानंतर दोन्ही बाजुंनी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. युजवेंद्र चहलने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली याखाली लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांनाच लक्ष वेधून घेतलं.

भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि पूर्व पत्नी धनश्री वर्मा(sports news) यांचा फेब्रुवारी 2025 रोजी घटस्फोट झाला. दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. मात्र त्यांचं लग्न केवळ 18 महिने चाललं आणि त्यांच्या नात्यात सर्वकाही ठीक नव्हतं त्यामुळे 2022 पासून ते वेगळे राहत होते अशी माहिती कोर्टात सादर करण्यात आली. अखेर मुंबई कौटुंबिक न्यायालयाने या दोघांच्या घटस्फोटावर निर्णय दिला आणि दोघे विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटानंतर दोघे वेगळे का झाले याची अनेक कारण समोर आली.

एका शोमध्ये धनश्रीने युजवेंद्र तिच्या सोबत चिट करत होता असं म्हटलं. तर काही मीडिया रिपोर्ट्समधून धनश्रीला मुंबईला राहायची इच्छा होती, आणि तिने युजवेंद्रला हरियाणातील आपलं घर सोडून मुंबईला शिफ्ट होण्यासाठी सांगितलं होतं. पण युजवेंद्रला त्याचे आई वडील आणि कुटुंबासोबत हरियाणाच्या राहायचे होते. यारून त्यांच्यात बरेच वाद सुद्धा झाले अशी कारणं समोर आली.

युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात तो काळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसला. या फोटोला युझवेंद्रने कॅप्शन लिहिलं की, ‘लग्नासाठी तयार आहे फक्त मुलगी पाहिजे…’ या कॅप्शन सह त्याने हसण्याचे ईमोजी टाकले. युझवेंद्र आणि धनश्री यांच्या घटस्फोटानंतर युझवेंद्रचं नाव आरजे महिवशशी जोडलं गेलं. अनेकदा आयपीएल सामन्यात ती त्याला चिअर करताना दिसली. तसेच दोघांनी एकत्र सोशल मीडियावर काही फोटो सुद्धा शेअर केले होते.

घटस्फोट झाल्यावर धनश्रीला युझवेंद्रकडून 4.75 कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाले आहेत. कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार चहल आणि धनश्री हे दोघे 2020 मध्ये लग्न बंधनात अडकले. परंतु त्यांच्या नात्यात सर्वकाही नीट नव्हते त्यामुळे 2022 पासून ते वेगळे राहतायत. अखेर काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली. तसेच हायकोर्टाने त्यांचा सहा महिन्यांचा कुलिंग पिरिएड सुद्धा माफ केल्याने त्यांच्या घटस्फोटावर लवकर निर्णय झाला त्यांचा घटस्फोट 20 मार्च 2025 रोजी अधिकृतपणे निश्चित झाला.

हेही वाचा :

हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!

सोन्यात मोठा उलटफेर! तीन दिवसात किंमतीत तुफान, काय आहे भाव?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी राजकीय समीकरणं जुळणार? पवारांच्या राष्ट्रवादीने दिले संकेत..