सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. (gold)इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार, गुरुवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव वाढून 1,26,081 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 1,59,025 रुपयांवर पोहचला आहे. अखिल भारतीय सराफा संघानुसार, सोने आणि चांदीच्या किंमतीत स्थानिक करासह मोठी वाढ झाली आहे. तर जागतिक बाजारात सोने 4,164.30 डॉलर प्रति औंसवर आहे. तर चांदीत वाढ होऊन 52.37 डॉलर प्रति औंसवर आहे. वायदे बाजारात सोन्याचा सौदा वाढून 1,25,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर चांदीचा सौद्यात वाढ होऊन एका किलोसाठी हा भाव 1,57,709 रुपयांवर पोहचला आहे.

25 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 1 ग्रॅम मागे 191 रुपयांची वाढ झाली. तर 26 नोव्हेंबर रोजी 1 ग्रॅम सोन्याची किंमत 87 रुपयांनी वाढली. तर आज सकाळच्या सत्रात ही वाढ दिसून आली. (gold)गुडरिटर्न्सनुसार, आज सकाळी एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 12,807 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 11,741 रुपये इतका आहे.25 नोव्हेंबर रोजी चांदी किलोमागे 4 हजार रुपयांनी महागली. तर 26 नोव्हेंबर रोजी हा भाव 2 हजारांनी वधारला. आज सकाळच्या सत्रात बाजारातील संकेतानुसार 4 हजार रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचा भाव 1,73,000 रुपये इतका आहे. गेल्या तीन दिवसात चांदीने मोठी उसळी घेतली आहे.

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. (gold)सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा :
हिवाळ्यात गुलाबाच्या रोपट्याला फुले येत नाहीत? या ट्रिक जाणून घ्या
‘या’ तारखेपासून राज्यातील ६०० शाळा बंद! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
लग्नातच स्मृतीने पलाशला रंगेहाथ पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याच्या नव्या दाव्याने खळबळ!