पेट्रोल डिझेलच्या किंमती गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर आहेत.(claim)पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. परंतु पेट्रोलचे दर कमी व्हावेत, अशी वाहनधारकांची इच्छा आहे. दरम्यान, देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतात.अमेरिकन एजन्सी जेपी मॉर्गन यांनी याबाबत भविष्यवाणी केली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती या ५० टक्के म्हणजे अर्ध्या कमी होतील, असं त्यांनी सांगितलंय.अमेरिकन एजन्सी जेपी मॉर्गनने कच्च्या तेलाच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. २०२७ मध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचे दर ३० डॉलर होऊ शकतात. यामागचे करण म्हणजे तेलाचा पुरवठा हा मागणीपेक्षा खूप जास्त आहे. याचा परिणाम भारतावरदेखील होणार आहे.

भारत देश कच्च्या तेलाच्या गरजेपेक्षा ८५टक्के जास्त तेल आयात करतो. (claim)यासाठी सरकारला मोठी रक्कम मोजावी लागते. दरम्यान, जर कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्या झाल्या तर त्याचा परिणाम थेट पेट्रोल डिझेलवर होऊ शकतो.जेपी मॉर्गनच्या मते, पुढच्या तीन वर्षात तेलाचा वापर आणखी वाढेल. तेलाचे उत्पादनदेखील वाढेल. ओपेकसह अनेक देश कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवणार आहे. या वाढीव उत्पन्नामुळे बाजारात भर पडणार आहे. यामुळे पेट्रोलच्या किंमती कमी होतील.

जेपी मॉर्गनच्या रिपोर्टनुसार, यानंतर जागतिक तेलाची मागणी दररोज ०.९ दशलक्ष बॅरलने वाढेल. (claim)ज्यामुळे तेलाचा वापर १०५. दशलक्ष बॅलर होईल.जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, २०२७ पर्यंत तेलाच्या किंमती ४२ डॉलरपर्यंत घसरु शकतात. वर्षाअखेरीस हे दर ३० डॉलरच्या खाली येऊ शकतात. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमती प्रति बॅरल ६० डॉलरच्या वर आहेत. त्या अर्ध्या होतील. परिणामी सरकारी खर्च कमी होईल. तेल कंपन्यांनादेखील फायदा होईल. यामुळे पेट्रोल डिझेलचे दरदेखील अर्धे होऊ शकतात.

हेही वाचा :

हिवाळ्यात गुलाबाच्या रोपट्याला फुले येत नाहीत? या ट्रिक जाणून घ्या

‘या’ तारखेपासून राज्यातील ६०० शाळा बंद! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

लग्नातच स्मृतीने पलाशला रंगेहाथ पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याच्या नव्या दाव्याने खळबळ!