दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीज सुरु झाली आहे.(statement)काल पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली एक शानदार इनिंग खेळला. कोहलीने 120 चेंडूत 135 धावा केल्या. यात 11 फोर आणि 7 सिक्स होते. विराटच्या या शतकी खेळीमुळे भारताने पहिला वनडे सामना 17 धावांनी जिंकला. विराटच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असताना त्याने ही शानदार शतकी खेळी केली. रिपोर्टनुसार या सीरीजनंतर बीसीसीआय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्याबद्दल एक बैठक करणार आहे. या शतकी खेळीनंतर विराटने आपली दावेदारी अजून मजबूत केली आहे. भारताचे फलंदाजी कोच सितांशु कोटक यांनी विराटच्या फ्यूचरबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.विराट कोहली आता 37 वर्षांचा आहे. पण त्याच्या प्रदर्शनात अजून घसरण झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये तो फॉर्ममध्ये दिसतोय. विराट 9 महिन्यानंतर भारतात आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. तो एक मोठी इनिंग खेळण्यात यशस्वी ठरला.

रोहितसोबत दुसऱ्याविकेटसाठी त्याने 136 धावांची भागिदारी केली. (statement)भारताचे फलंदाजी कोच सितांशु कोटक यांनी कोहलीच्या फलंदाजीचं कौतुक केलं. “ही एक सुंदर इनिंग होती. तो खरच सुंदर खेळला. फक्त वनडे फॉर्मेटच नाही. विराटने सर्वच फॉर्मेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केलय” असं सितांशु कोटक म्हणाले.सितांशु कोटक यांनी विराट कोहलीच्या फ्यूचरबद्दल एक मोठं वक्तव्य केलं. विराट कोहली 2027 वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार का? असा प्रश्न सितांशु कोटक यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, “हे सगळं लक्षात घेण्याची गरज का आहे? हे मला समजत नाही.

तो खरच चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या भविष्याबद्दल बोलायची गरज आहे, (statement)असं मला वाटत नाही. तो ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय ते कमाल आहे. ज्या प्रकारचा त्याचा फिटनेस आहे, त्यावर प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही”विराट कोहली सोबत रोहित शर्मा सुद्धा या मॅचमध्ये दमदार इनिंग खेळला. त्याने 51 चेंडूत 57 धावा केल्या. यात 5 फोर आणि तीन सिक्स होते. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुद्धा रोहित शर्मा प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरलेला. टीम इंडियासोबत भारतीय फॅन्ससाठी सुद्धा ते चांगले संकेत आहेत. सीरीजचे पुढचे सामने सुद्धा या दोघांसाठी महत्वाचे राहणार आहेत.
हेही वाचा :
गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या
कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द
‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावा