आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका वाढतो आहे. सातत्याने बसून काम करणे, ताण, तसेच अस्वास्थ्यकर आहारामुळे वजन वाढणे ही समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. लोकांनी सकाळी फ्रुट्स, ज्यूस किंवा सलाड खाण्याची सवय ठेवली असली तरी, काही वेळा गाजराच्या रसाबद्दल गैरसमज असतो की तो वजन वाढवतो. पण प्रत्यक्षात गाजराचा रस (drink)वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, गाजरामध्ये फायबर, कॅरोटीनॉइड्स, व्हिटॅमिन सी आणि ई तसेच फिनोलिक अॅसिडसारखी पोषक तत्त्वे जास्त प्रमाणात असतात, जे रोगप्रतिरोधकतेसाठी लाभदायक आहेत. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चनुसार गाजरामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. एका अभ्यासानुसार रिकाम्या पोटी 50 मिली गाजराचा रस सहा आठवड्यांपर्यंत सेवन(drink) केल्यास वजन लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
गाजराचा रस केवळ वजन कमी करण्यातच नाही तर त्वचा सुधारण्यात, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात आणि पचन सुधारण्यातही उपयुक्त आहे. त्यातील व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात, रोगप्रतिबंधक शक्ती वाढवतात आणि फायबरमुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनासारख्या समस्या कमी होतात. त्यामुळे रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात गाजराचा रस सामील करणे निरोगी जीवनशैलीसाठी फायदेशीर ठरते.

हेही वाचा :
गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी… Video Viral
५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच…
महापालिका निवडणुकीत मनसे व ठाकरे गटाची युती निश्चित…