किचनमध्ये सहज उपलब्ध असलेली लवंग (Cloves)आता पुन्हा चर्चेत आली आहे. अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरने झोपण्यापूर्वी लवंग खाण्याचे आणि लवंगाचे पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे समोर आणल्यानंतर लवंगाकडे आरोग्यासाठी पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. गरम मसाल्यातील हा छोटासा मसाला फक्त चव वाढवणारा नाही तर अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

डॉक्टरांच्या संशोधनानुसार रात्री झोपण्यापूर्वी लवंग(Cloves) खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुधारते, अपचन आणि पोट फुगणे यासारख्या तक्रारी कमी होतात. लवंगातील शांत करणारे घटक तणाव कमी करून झोपेची गुणवत्ता वाढवतात. विशेष म्हणजे लवंगातील अँटीऑक्सिडंट आणि औषधी गुणधर्म यकृत डिटॉक्स करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. उष्ण प्रकृती आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे सर्दी-खोकला आणि कफ कमी करण्यास मदत होते. तोंडातील दुर्गंध, दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्या कमी करण्यासाठीही रात्री लवंग चावून खाणे उपयुक्त मानले जात आहे.

लवंगाचे पाणी पिल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. तसेच अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत मिळते.लवंगाचे पाणी तयार करणेही सोपे आहे—चार ते पाच लवंग एका कप पाण्यात उकळून घेतल्यानंतर पाच मिनिटे मंद आचेवर गरम करावे. हे पाणी थंड झाल्यावर झोपण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटे आधी पिणे फायदेशीर ठरते. तज्ज्ञांचा सल्ला आहे की हे पाणी मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.लवंगाच्या या फायद्यांमुळे घरगुती उपायांमध्ये हा मसाला पुन्हा महत्त्वाचा ठरत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

BSNL युजर्सना झटका, ‘या’ स्वस्त प्लॅनची वैधता कमी केली…
मुलांचे मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी ‘हे’ ५ महत्त्वाचे उपाय नक्की करा!
जगातील सर्वात मोठ्या S*x स्कँडलची A To Z माहिती येणार समोर…