जगातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होणार आहे. अमेरिकेत लैंगिक तस्करी प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या प्रकरणातील माहिती सार्वजनिक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणातील माहिती सार्वजनिक करण्यास संमती दिली आहे आणि आता एपस्टीनच्या फाइल्स उघडल्या जाणार आहेत. एपस्टीन फाइल्सच्या प्रकाशनाला विरोध करणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना त्यांच्याच पक्षातील कायदेविषयक तज्ज्ञांनी स्वत:ची भूमिका बदलण्यास भाग पाडले आहे(information). अमेरिकन काँग्रेसने एपस्टीन फाइल्सच्या प्रकाशनासाठी एक विधेयक मंजूर केले आहे. ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केल्याने आता त्याचे कायद्यात रूपांतर झालं आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथआउट सोशल प्लॅटफॉर्मवरुन याबद्दलची माहिती दिली आहे. “मी नुकतेच एपस्टीन फाइल्सच्या प्रकाशनासाठीच्या विधेयकावर स्वाक्षरी केली,” असं अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केलं.”2019 मध्ये ट्रम्प सरकारच्या न्याय विभागाने (डेमोक्रॅट नव्हे!) आरोप लावलेले जेफ्री एपस्टीन हे आयुष्यभर डेमोक्रॅट होते, त्यांनी डेमोक्रॅट नेत्यांना हजारो डॉलर्स देणग्या दिल्या आणि अनेक प्रमुख डेमोक्रॅट व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते… विसरू नका – बायडेन प्रशासनाने डेमोक्रॅट एपस्टीनशी संबंधित एकही फाइल किंवा पानभर माहितीही(information) जारी केलेली नाही, किंवा त्यांनी कधीही त्यांच्याबद्दल भाष्य केलेलं नाही. डेमोक्रॅट्सनी आमच्या आश्चर्यकारक अन् थक्क करणाऱ्या विजयांपासून लक्ष विचलित करण्यासाठी ‘एपस्टीन’ मुद्द्याचा वापर केला आहे, रिपब्लिकन पक्षापेक्षा त्यांनाच या प्रकरणाची जास्त काळजी वाटतेय,” असंही ट्रम्प म्हणालेत.
“आता अमेरिकेच्या न्याय विभागाला एपस्टीनच्या फायली जगासमोर उघड करण्यास भाग पाडले आहे आणि या घाणेरड्या गुपितात कोण सामील होते हे आपल्याला कळेल,” असंही ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. अमेरिकेतील अब्जाधीश जेफ्री एपस्टीनचे नाव मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. त्याच्यावर चार वर्षांपूर्वी किशोरवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून खटला चालवण्यात आला होता.ट्रम्प आणि एपस्टीन यांचे अनेक वर्षांपासूनच जवळचे संबंध होते. अनेक पार्ट्यांमध्ये दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ काढले जायचे. मात्र, या प्रकरणाची चर्चा झाल्यापासून ट्रम्प यांनी वारंवार, मी एपस्टीनच्या दुष्कृत्यांमध्ये सहभागी नव्हतो, असं स्पष्ट केलं आहे.
1990 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ट्रम्प एपस्टीनला सामाजिक स्तरावर ओळखत होते. दोघांनाही अनेकदा सार्वजनिकरित्या कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले. 2021 मध्ये एपस्टीनची सहकारी घिसलेन मॅक्सवेलच्या खटल्यादरम्यान, एपस्टीनचे दीर्घकाळचे पायलट लॉरेन्स वायसोकी यांनी साक्ष दिली की ट्रम्प यांनी एपस्टीनच्या खाजगी विमानातून अनेक वेळा उड्डाण केले. तथापि, ट्रम्प यांनी विमानातून प्रवास केल्याचा दावा फेटाळू लावला. आता एपस्टीन फाइल्समधून काय माहिती समोर येते आणि जगातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटसंदर्भात काय खुलासा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एपस्टीनवर 2005 पासून आरोप होते की तो 14 ते 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलींना पैशाचे आमिष दाखवून, ‘मसाज’च्या नावाखाली लैंगिक शोषण करायचा. या मुलींना तो आपल्या श्रीमंत मित्रांना ‘भेट’ म्हणून द्यायचा. ही एक ऑर्गनाईज सेक्स ट्रॅफिकिंग रिंग होती. 1990 च्या दशकापासून तो आणि त्याची मुख्य साथीदार घिस्लेन मॅक्सवेल (Ghislaine Maxwell – ऑक्सफर्ड शिक्षित ब्रिटिश सोशलाइट) मुलींची भरती करुन घ्यायचे. मुलींना ‘मसाज द्या, 200-300 डॉलर मिळतील” असं सांगितलं जायचं. नंतर जबरदस्तीने त्यांना लैंगिक कृत्य करायला भाग पाडलं जायचं. कित्येक मुलींनी सांगितलं की त्यांना इतर मुली आणायला सांगितलं जायचं. ही एक प्रकारची पीरॅमीड स्क्रीम होती. एपस्टीनच्या घरात आणि बेटावर छुपे कॅमेरे होते, ज्यामुळे तो लोकांना ब्लॅकमेल करू शकत होता. हा भाग अजून पूर्ण सिद्ध झालेला नाही, पण अनेक पीडितांनी असा दावा केला आहे.
हेही वाचा :
शेख हसीना!”सजा ए मौत” न्याय कि, न्यायाची थट्टा ?
अननस खाण्याअगोदर ‘हे’ वाचा, ‘या’ लोकांसाठी अतिशय घातक
जुनं वाहन वापरणाऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा धक्का!