BSNL ने पुन्हा एकदा आपल्या प्रीपेड युजर्सना (users)धक्का दिला असून, दोन लोकप्रिय स्वस्त प्लॅनची वैधता कमी केली आहे. स्वस्त दरात सेवा देणारी कंपनी म्हणून BSNL ओळखली जात असली, तरी अलीकडच्या काळात एकापाठोपाठ एक बदल करत ग्राहकांची चिंता वाढवली आहे. 107 रुपये आणि 197 रुपयांचे प्लॅन अनेकांना परवडणारे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. मात्र आता या दोन्ही प्लॅनची वैधता कमी केल्याने कमी बजेटमध्ये रिचार्ज करणाऱ्या युजर्सचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, युजर्समध्ये या बदलांविषयी नाराजीचे वातावरण आहे.

याचदरम्यान BSNL ने आपल्या ‘X’ हँडलवरून एका नव्या रिचार्ज(users) प्लॅनची घोषणा केली आहे. 251 रुपयांच्या या प्लॅनला 14 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आले असून तो 14 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध राहणार आहे. कमी किंमतीत जास्त फायदे देणारा हा प्लॅन विद्यार्थ्यांसाठी खास उपयुक्त मानला जात आहे. 251 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि तब्बल 100 GB डेटा बेनिफिट दिला जात आहे. डेटा संपल्यास स्पीड 40kbps वर येतो.
कंपनीने यासोबत आणखी एका ऑफरमध्ये दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS असे बेनिफिट्स असलेला 50 दिवस वैधतेचा प्लॅनही उपलब्ध करून दिला आहे. ऑनलाइन क्लासेस, व्हिडिओ लेक्चर्स आणि प्रोजेक्ट सबमिशन्ससाठी सतत इंटरनेटची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे दोन्ही प्लॅन मोठी मदत ठरणार असल्याचे BSNL चे म्हणणे आहे. किफायतशीर प्लॅनचा आधार असलेल्या BSNL कडून पुन्हा वैधता कमी केल्याने युजर्समध्ये नाराजी वाढली असली, तरी नव्या प्लॅन्समुळे काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचेही ग्राहकांचे मत आहे.
हेही वाचा :
शेख हसीना!”सजा ए मौत” न्याय कि, न्यायाची थट्टा ?
अननस खाण्याअगोदर ‘हे’ वाचा, ‘या’ लोकांसाठी अतिशय घातक
जुनं वाहन वापरणाऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा धक्का!