देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या(gold)-चांदीच्या भावात घट सुरूच असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,23,884 रुपयांवरून घसरून 1,22,561 रुपयांवर आली असून तब्बल 1,323 रुपयांची घट नोंदली गेली आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा दरही 1,212 रुपयांनी कमी होऊन 1,12,266 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोनेही स्वस्त झाले असून त्याची किंमत 992 रुपयांनी घसरून आता 91,921 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.

चांदीच्या किंमतीतही मोठी घट पाहायला मिळाली असून 1 किलोग्राम चांदीचा भाव 1,58,120 रुपयांवरून कमी होत 1,54,113 रुपयांवर आला आहे. म्हणजेच चांदी 4,007 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आयबीजेए दररोज दिवसातून दोनदा सोन्या-चांदीचे दर अपडेट करते आणि बाजारातील घडामोडींनुसार किंमतीत चढ-उतार होत असतात.
आंतरराष्ट्रीय बाजारातही याच पद्धतीचा कल दिसत असून कॉमेक्सवर सोन्याचा (gold)दर 0.11 टक्क्यांनी घटून 4,078.20 डॉलर प्रति औंस झाला आहे, तर चांदीचा दर 0.27 टक्क्यांनी कमी होऊन 50.71 डॉलर प्रति औंस नोंदवला गेला आहे. मात्र मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आगामी करारांमध्ये किंचित वाढ दिसून आली असून 5 डिसेंबर 2025 च्या सोन्याच्या करारात 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 1,23,130 रुपयांवर तर चांदीच्या करारात 0.08 टक्क्यांची वाढ होऊन तो 1,55,225 रुपयांवर पोहोचला आहे.दर घटल्यामुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या खरेदीची योजना करणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी मानली जात असून तज्ज्ञांनी ग्राहकांना योग्य वेळी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा :
कॅल्शिअमच्या मुद्द्यात सगळ्यात पुढे! करा याचे सेवन, दूर होईल सर्व आजार
पाय घसरला अन् मिस जमैका स्टेजवरून पडली, झाला मोठा अपघात! रुग्णालयात केलं दाखल; Video Viral
लाडक्या बहीणींच्या पैशांवर डल्ला, आता कर्मचाऱ्यांना सरकारी ‘पाहुणचार’